आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांसाठी महिला चालकांची टॅक्सी सेवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे मॅनहटन समजल्या जाणार्‍या हरयाणातील गुडगाव शहराने शुक्रवारी आणखी एक अनोख्या प्रयोगाचा शुभारंभ केला. या शहरात आता महिलांसाठी खास टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे आणि यासाठी केवळ महिला चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी गुडगावमध्ये खास महिलांसाठी पिंक ऑटोरिक्षा सुरू करण्यात आल्या आहेत.

काय आहे वैशिष्ट्य -जी कॅब्समध्ये जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे गाडीचे अचूक ठिकाण नियंत्रण कक्षाला सतत कळणार आहे. - प्रत्येक स्टॉपसाठी शेअरिंग सिस्टीम करण्याची सुविधाही महिला प्रवाशांना मिळणार आहे.

35 महिला चालकांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना दोन महिने प्रशिक्षण देण्यात आले.

125 जी कॅब्स शहरात धावणार आहेत.अप्रा ग्रुप या कंपनीने ही सेवा सुरू केली आहे.