आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haryana Minister Gopal Kanda Blamed For Airhostess Suicide

एअर होस्टेस आत्महत्या प्रकरण, मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशांतर्गत एअरलाइन एमडीएलआरमधील 23 वर्षीय माजी महिला कर्मचा-याने दिल्लीतील घरात आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून एअरलाइनचे मालक व हरियाणाचे गृह राज्यमंत्री गोपाल कांडा यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रात्री कांडा यांनी पदाचा राजीनामा दिला.
एमडीएलआर एअर लाईन्समध्ये काम करणा-या गीतिका शर्माने शनिवारी अशोक विहार येथील राहात्या घरी फाशी लावून आत्महत्या केली. रविवारी तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला सापडला. तिच्या जवळ सापडलेल्या पत्रात तिने गोपाल कांडा यांचे नाव घेतले आहे. तसेच कांडाचे एका महिलेसोब अवैध संबंध असल्याचाही उल्लेख पत्रात आहे. त्या महिलेला कांडाकडून झालेला एक मुलगा देखील आहे.
एमडीएलआर एअरलाईन्सचे मालक असलेले कांडा आणि एअर लाईंन्सची एक महिला अधिकारी अरुणा शर्मा यांच्यावर एअर होस्टेसला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
दिल्ली पोलिसांनी रविवारी कांडा यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला. दिल्ली पोलिसांचे एक पथक कांडा यांचे घराची तपासणी करण्यासाठी गुडगांवला पाठविण्यात आले आहे. डीसीपी पी.करुणाकरण यांनी सांगितल्यानूसार, गीतिकाच्या पत्रात लिहिले आहे की, 'त्यांनी (कांडा यांनी) माझा विश्वासघात केला.'
गीतिकाचे बंधु गौरव शर्मा म्हणाले, 'गीतिकावर नोकरीवर पुन्हा हजर राहण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यामुळे तिने आत्महत्या केली. गोपाल कांडा यांच्यावर आरोप करताना गौरव म्हणाले, महिलांबाबत कांडा यांची वागणूक चांगली नव्हती. मंत्री कांडा गीतिका दुबईला राहात असताना तिला फोन करुन धमकावत होते. कामावर पुन्हा हजर राहण्यासाठी दबाव टाकत होते.
२३ वर्षीय गितीका आधी एमडीएलआर एअर लाईंन्समध्ये एअर होस्टेस होती. त्यानंतर तिने एमिरेट्स एअर लाईंन्समध्ये काम करण्यास सुरुवात केली. २०११ मध्ये गितीकाने पुन्हा एमडीएलआर एअर लाईंन्स जॉईन केले आणि एमडीएलआरची सहकंपनी 'सुपरसोनिक'मध्ये संचालकपद मिळविले. त्यानंतर गीतिकाने ही नोकरी देखील सोडून दिली.
गीतिकाचे बंधु गौरव यांचे म्हणणे आहे की, एमडीएलआर एअर लाईंन्स बंद झाल्यानंतर गोपाल कांडा यांनी गीतिकाला दुसरी नोकरी देण्याचा आश्वासन दिले होते. मात्र, तिने ते नाकारले आणि दुबईला एमिरेट्स एअर लाईंन्ससोबत काम सुरु केले. त्यानंतर कांडाने एमिरेट्स एअर लाईंन्सला पत्र पाठवून गीतिकावर चारित्र्यहिनतेचा आरोप केला. त्यामुळे दुबईच्या कंपनीने तिला नोकरीवरुन काढून टाकले. कांडा यांनी तिची समजूत काढल्यानंतर गीतिकाने पुन्हा त्यांच्या कंपनीत नोकरी स्विकारली.
हरिियाणा सरकारमध्ये गृहरिाज्य मंत्री असलेल्या कांडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकारणही तापले आहे. प्रमुख विरोधी पक्ष इंडियन नॅशनल लोकदलने कांडा यांच्यावर हत्येचा गु्न्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
बलात्कार पीडित महिलेने दिला बालकाला जन्म, माजी मंत्री दहू प्रसाद मुलाचे पिता?
सांगलीत 2 मुलांसह महिलेची आत्महत्या
नरेंद्र मोदी आत्महत्या करणार होते- केशूभाई पटेलांचा खळबळजनक दावा