आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hate Speech: Akbaruddin Gets Bail In Nizamabad Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आक्षेपार्ह भाषण : अकबरुद्दीन ओवेसींना जामीन मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निजामाबाद- आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी अटकेत असलेले 'एमआयएम'चे आमदार अकबरुद्दीन ओवेसीला निजामाबादमधील स्थानिक न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला.

निजामाबादमधील अतिरिक्त सत्र न्यायाधिशाने ओवेसींना जामीन मंजूर केला. त्यासाठी त्यांना दोन साक्षीदारांनी दिलेल्या प्रत्येकी दहा हजार जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. तसेच पुढील तपासाकामी सहकार्य करण्याचे आश्वासनही ओवेसी यांनी कोर्टाला दिले आहे.


ओवेसींनी राष्ट्रविरोधी भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच राष्ट्रद्रोहाचा खटला त्यांच्यावर चालवावा, अशी याचिका त्यांच्याविरोधात दाखल झाल्या होत्या. याचबरोबर ओवेसी यांनी निर्मल, आदिलाबाद येथेही आक्षेपार्ह भाषणे केली होती.