आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैन्‍य गुप्‍तचर खात्‍याच्‍या लिपिकाकडून आयएसआयला माहिती विकण्‍याचा प्रयत्‍न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः सैन्‍य गुप्‍तचर खात्‍यातील हेड क्‍लर्क म्‍हणून काम करणा-या एका सैनिकावर पाकिस्‍तानसाठी हेरगिरी करण्‍याचा संशय आहे. पाकिस्‍तानी गुप्‍तचर संस्‍था आयएसआयला त्‍याने गोपनिय माहिती विकण्‍याचा त्‍याने प्रयत्‍न केला होता. हे उघडकीस येताच त्‍याला अटक करण्‍यात आली आहे. शिवदासन असे त्‍याचे नाव असून तो अतिसंवेदनशील माहिती पाकिस्‍तानला विकण्‍याचा प्रयत्‍न करीत होता. त्‍यामुळे सैन्‍य प्रशासनाची झोप उडाली आहे.
एका इंग्रजी दैनिकाने यासंदर्भात वृत्त दिले असून या हेरगिरीचा पर्दाफाश एका विशेष मोहिमेद्वारे करण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. शिवदासनकडून एक सीडी, पेन ड्राईव्‍ह आणि काही गोपनीय कागदपत्रे जप्‍त करण्‍यात आली आहेत. भारतीय सेनेच्‍या मोहिमा, सैन्‍याच्‍या पोझिशन्‍स, सेना मुख्‍यालयातील वरिष्‍ठ अधिका-यांमधील चर्चा, इत्‍यादी माहिती तो आयएसआयला पुरविणार होता.
सैन्‍य गुप्‍तचर खात्‍याच्‍या विशेष तांत्रिक मदत विभागात शिवदासन काम करीत होता. सैन्‍याशी संबंधीत अतिशय खास आणि अति गोपनीय माहिती या विभागाच्‍या कक्षेत आहे. बेकायदेशीर पद्धतीने हेरगिरी केल्‍याचे आरोप या विभागावर काही दिवसांपुर्वी करण्‍यात आले होते. परंतु, तत्कालीन सैन्‍यप्रमुख जनरल व्‍ही. के. सिंग यांनी ते आरोप फेटाळले होते.
पाकिस्‍तानातील चोर निघाला आयएसआयचा हेर
संरक्षणमंत्र्यांच्‍या कार्यालयाची हेरगिरी केल्‍याचा संशय
पाक अभिनेत्रीची इगतपुरीत हेरगिरी ?