आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍लीत जोरदार पाऊस, वाहतूक विस्‍कळीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानी दिल्ली परिसरात सोमवारी सायंकाळपासून रात्रभर जोरदार पाऊस झाला असून, आज (मंगळवार) सकाळीही रिमझिम पाऊस पडत असल्याने तापमानात कमालीची घट झाली आहे. पावसामुळे दिल्‍लीतील वाहतूक व्‍यवस्‍था कोलमडली आहे. काश्मिर खो-यातही सकाळपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली आहे.

दिल्लीत आणखी काही दिवस पावसाची शक्यता असल्याचे, हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्लीत ९.४ मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीसह उत्तर भारतात अनेक शहरांमध्ये पाऊस पडल्याचे वृत्त आहे. फरीदाबाद येथे गारांसह जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली असून, हिमकडा कोसळण्याच्या घटना घडण्याचा इशारा देण्यात आला आहे.