आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्‍वीवरचा स्‍वर्ग तुफानी बर्फवृष्‍टीमुळे झाला नरक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - श्रीनगर आणि लगतच्या परिसरामध्ये गेल्या चोवीस तासांपासून तुफान बर्फवृष्‍टी सुरु आहे. त्‍यामुळे पारा आणखी घसरला असून कडाक्‍याची थंडी पडली आहे. काश्मिरातील जनजीवन विस्कळित झाले आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
श्रीनगरमध्ये आज सकाळी 8 पर्यंत सहा इंच बर्फवृष्‍टी झाली. पहलगाम 3 इंच, गंडेरबाल 6 इंच, बडगाम 5 इंच, बंदीपुरा 5 इंच, बारामुल्ला 6 इंच, शिपिअन 3 इंच आणि अनंतनाग येथे 1 इंच बर्फवृष्टी झाली. याशिवाय गुलमर्ग येथेही मोठा बर्फवृष्‍टी झाल्याचे वृत्त आहे. पर्वतीय भागात होणारी बर्फवृष्टी ही दोन दिवस सुरु राहण्‍याची शक्‍यता आहे. त्यानंतर बर्फवृष्टी कमी होईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
या बर्फवृष्टीमुळे श्रीनगरमधील पारा खाली उतरला असून शून्य ते -3.5 डिग्री इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर गुलमर्ग येथे -9.5 डिग्री इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. बर्फवृष्टी होत असताना देखील येथील वीजपुरवठा कायम ठेवण्यात आला आहे.