आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Helicopter Deal Fact Sheet Mentions Name Of Pranab Mukherjee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेलिकॉप्‍टर खरेदीप्रकरणी फॅक्‍टशीटमध्‍ये प्रणव मुखर्जींचाही उल्‍लेख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- राज्‍यसभा उपसभापती पी. जे. कुरियन यांच्‍यावरी आरोपांनंतर कॉंग्रेसच्‍या अडचणी आणखी वाढण्‍याची शक्‍यता आहे. प्रकरण नुकत्‍याच उघडकीस आलेल्‍या फिनामेक्कानिका कंपनीसोबत झालेल्‍या हेलिकॉप्‍टर खरेदी व्‍यवहारातील गैरव्‍यवहाराचे आहे. याप्रकरणामध्‍ये आता राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेही नाव समोर येत आहे. युपीए सरकारकडून तयार करण्‍यात आलेल्‍या फॅक्‍टशीटमध्‍ये प्रणव मुखर्जी यांचेही नाव आहे. त्‍यामुळे अर्थसंकल्‍पीय अधिवेशनामध्‍ये विरोधकांना सरकारविरुद्ध हल्‍ला तीव्र करण्‍याची संधी मिळणार आहे.

इटलीची कंपनी फिनमेक्‍कानिकाकडून 12 हेलिकॉप्‍टर खरेदीला 2005 मध्‍ये मंजूरी देण्‍यात आली होती. त्‍यावेळी प्रणव मुखर्जी संरक्षण मंत्री होते. फॅक्‍टशीटनुसार, तत्‍कालीन संरक्षण मंत्री आणि एअर चीफ मार्शल यांच्‍या कार्यकाळात या व्‍यवहाराच्‍या निविदेला अंतिम स्‍वरुप देण्‍यात आले होते. त्‍यावेळी एस. पी. त्‍यागी हे एअर चीफ मार्शल होते.

ही फॅक्‍टशीट भाजपच्‍या नेतृत्वातील एनडीए सरकारवरही प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित करते. त्‍यानुसार, 2003 मध्‍ये तत्‍कालीन राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागार ब्रजेश मिश्रा यांनी निकश बदलण्‍यास सांगितले होते. निविदेसाठी पात्रता 18 हजार फुट उंचीच्‍या क्षमतेची होती. ही उंची 14 हजार फुटांपर्यंत कमी करण्‍याचे मिश्रा यांनी सांगितले होते. 18 हजार फुटांच्‍या निकषानुसार केवळ एकच कंपनी बोली लावू शकत होती.