आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Helicoptor Agreement Information Present Say Cag To Defence Ministry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेलिकॉप्टर सौद्याची माहिती सादर करण्याचे कॅगचे संरक्षण मंत्रालयाला निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदी करारातील कथित लाचखोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नियंत्रक व महालेखापाल परीक्षकांनी (कॅग) संरक्षण मंत्रालयाकडे या कराराची कागदपत्रे मागितली आहेत. मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 हजार 600 कोटी रुपयांच्या या खरेदी करारासंदर्भात कॅगने गेल्या आठवड्यात सविस्तर प्रश्नावली पाठवली असून त्याची उत्तरे देण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे.

हेलिकॉप्टर खरेदी व्यवहाराची चौकशी केली जात असून त्याचा अहवाल लवकरच येईल, असे कॅग विनोद रॉय यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ज्या दिवशी रॉय यांनी ही बाब स्पष्ट केली, त्याच दिवशी मंत्रालयाला कॅगकडून प्रश्नावली प्राप्त झाली होती. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबत झालेल्या कराराचा तपास याआधीच सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे, हे उल्लेखनीय.

कराराच्या चौकशीसाठी संरक्षण मंत्रालय, परराष्‍ट्र मंत्रालय तसेच सीबीआयची टीम सोमवारी रात्री इटलीची राजधानी रोमला रवाना झाली आहे. मंत्रालयाकडून ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचे उत्तर कंपनीकडून शुक्रवारपर्यंत येणे अपेक्षित आहे. कराराचे उल्लंघन झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असून त्याबद्दल हा करार रद्द का करण्यात येऊने याची विचारणा कंपनीकडे करण्यात आली आहे.

चर्चा करण्याची सरकारची तयारी
इटलीत कंपनीसोबत झालेल्या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील कथित लाचखोरीच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सरकार या प्रकरणी चर्चेस तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारकडे लपवण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे संसदेत प्रत्येक मुद्द्यावर चर्चेची आमची तयारी आहे. या मुद्द्यावर राजकीय वादंग उठल्याबाबत सिंग म्हणाले की, ‘संसद हा चर्चेचा एक मंच आहे आणि आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चेस तयार आहोत. विरोधकांनीही तशी तयारी दाखवावी.’ संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू होणार असून त्यात हा मुद्दा वादळी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यावर चर्चेची तयारी दर्शवल्याचे बोलले जात आहे.

हेलिकॉप्टरचे परीक्षणही भारताबाहेरच उरकले
व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सर्व निकष पूर्ण करणारे असल्याचे सांगून या हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात आली. हे हेलिकॉप्टर भारतात आणून त्याची कधी तपासणी झालीच नसल्याची कबुली संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. कराराच्या शर्यतीत उतरलेल्या अमेरिकन कंपनी सिकोर्स्की व ऑगस्टा वेस्टलँडच्या हेलिकॉप्टरचे मैदानी परीक्षणही भारताबाहेरच झाले. सिकोर्स्की हेलिकॉप्टर परीक्षणासाठी भारतात आणण्यास अमेरिकन कंपनी राजी झाली होती, तर ऑगस्टा हेलिकॉप्टरच्या परीक्षणासाठी एक दल ब्रिटनला पाठवण्यात आले होते.
वायुदलाच्या निवृत्त अधिका-यांने सांगितले की, जे हेलिकॉप्टर भारतीय वातावरणाच्या दृष्टिकोनातून खरेदी करण्यात येणार होते, त्याचे परीक्षण भारतात होणे आवश्यक होते. त्यामुळे भारतात न आणताच हे हेलिकॉप्टर खरेदी कसे करण्यात आले? हे हेलिकॉप्टर 15 हजार फूट उंचीवर उडण्यास सक्षम आहे, हे सिद्ध होणे आवश्यक आहे. कारण तेवढ्या उंचीवर सियाचीन हे ठिकाण आहे. तेथे त्याचे परीक्षण का करण्यात आले नाही?