आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकायुक्त नियुक्तीः गुजरात सरकार सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान देणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबादः गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांना उच्‍च न्‍यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्‍यायालयाने लोकायुक्त नियुक्ती योग्‍य ठरविली आहे.
गुजरातच्‍या राज्‍यपालांनी गेल्‍या वर्षी लोकायुक्तांची नियुक्ती केली होती. राज्‍यपाल कमला बेनीवाल यांनी आर. ए. मेहता यांची लोकायुक्त म्‍हणून नियुक्ती केली. होती. त्‍यावरुन नरेंद्र मोदी यांनी तीव्र नाराजी व्‍यक्त केली होती. या नियुक्तीला त्‍यांनी उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले होते. राज्‍यपालांनी लोकायुक्तांची नियुक्ती करताना मुख्‍यमंत्र्यांसोबत चर्चा केली नव्‍हती, असा आक्षेप मोदी सरकारने घेतला आहे. लोकायुक्त नियुक्तीवरुन भारतीय जनता पार्टीने संसदेतही गदारोळ केला होता. परंतु, न्‍यायालयाने ही नियुक्ती वैध ठरविली आहे.
या प्रकरणातील सुनावणीदरम्‍यान न्‍या. अकिल कुरेशी आणि न्‍या. सोनियाबहन गोकाणी यांच्‍यामध्‍ये मतभेद होता. त्‍यामुळे हा निर्णय मुख्‍य न्‍यायमुर्तींकडे सोपविण्‍यात आला होता.
लोकायुक्त नियुक्तीला वैध ठरविण्‍याच्‍या निर्णयाला सरकार सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान देणार असल्‍याचे गुजरातचे आरोग्‍यमंत्री जयनारायण व्‍यास यांनी स्‍पष्‍ट केले आहे. न्‍यायालयाचा निर्णय आम्‍ही स्‍वीकारु. परंतु, आमचे आक्षेपाचे मुद्दे कायम असल्‍याचे व्‍यास यांनी सांगितले.
उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयाचे कॉंग्रेसने स्‍वागत करताना भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली. कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी भाजपवर दुहेरी मापदंड वापरण्‍याचा आरोप केला. एकीकडे ते केंद्रात लोकपालवरुन गदरोळ घालतात तर दुसरीकडे स्‍वतःचे सरकार असलेल्‍या राज्‍यात 9 वर्षांपासून लोकायुक्त पद रिकामे ठेवतात. एवढेच नव्‍हे तर या पदाव‍रील नियुक्तीलाही आव्‍हान देऊन या प्रक्रीयेत खिळ टाकतात, अशी टीका सिंघवी यांनी केली.
गुजरात काँग्रेस नेते राष्ट्रपतींना भेटले
गुजरात लोकायुक्त प्रकरण पेटले
गुजरात लोकायुक्त नियुक्तीवरुन भाजपचा संसदेत गोंधळ
नरेंद्र मोदी यांचे मायावतींना फेसबुकच्या माध्यमातून समर्थन