आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान यंत्राबाबत स्‍वामींची याचिका फेटाळली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (ईव्हीएम) दुरुपयोग होण्यासंदर्भात सबळ पुरावे नाहीत, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदविताना जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका फेटाळून लावली. स्‍वामी यांनी 'ईव्हीएम'च्या दुरुपयोगाबाबत याचिका दाखल करताना मतदान यंत्रात नोंद झालेल्‍या मतांचे प्रिंटआऊट मिळावे, अशी मागणीही केली होती.
स्‍वामींच्‍या याचिकेवर सुनावणीदरम्‍यान न्‍यायालयाने सांगितले की, हा एक मोठा धोरणात्‍मक निर्णय आहे. याचा आवाका प्रचंड आहे. त्‍यामुळे याबाबत घाईने निर्णय घेणे योग्‍य होणार नाही. त्‍यासाठी सखोल विचार विनिमय होण्याची गरज आहे. तसेच स्‍वतः स्‍वामी यांनी मतदान यंत्रात फेरफार झाल्‍याचा आरोप केला नाही, असे उच्च न्यायालयाने सांगितले आहे.
स्वामी यांनी युक्तवाद करताना न्‍यायालयाला सांगितले, मतदान यंत्राद्वारे झालेल्‍या मतदानात पारदर्शकता नसते. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्याचा निर्णय घ्यावा. अमेरिका, ब्रिटन आणि जपान यांसारख्या देशांमध्ये मतपत्रिकेचा वापर करण्‍यात येतो.
यावर न्‍यायालयाने सांगितले की, भारतासारख्‍या देशात तसे करणे प्रचंड खार्चिक आहे. देशात 73 कोटी मतदार आहेत. त्‍यामुळे ही पद्धत परवडण्‍यासारखी नाही. परंतु, मतदान यंत्रातील तक्रारींबाबत चर्चा करुन तोडगा काढता येईल, असे न्‍यायालयाने सांगितले.