आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मोबाईलवरून करा रोज अनलिमिटेड एसएमएस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आता आपण मोबाइलद्वारे एका दिवसात हवे तेवढे एसएमएस करू शकतो. हायकोर्टाने शुक्रवारी दूरसंचार नियामक-ट्रायद्वारे घालण्यात आलेले कमाल 200 एसएमएसचे निर्बंध हटवण्याचे निर्देश दिले आहेत. व्यावसायिक एसएमएसवरील निर्बंध मात्र लागू आहेत.
टेलिकॉम वॉच डॉगकडून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्याद्वारे दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर हायकोर्टाने हा निर्णय दिला. हा मुद्दा लोकांच्या खासगी व्यवहाराशी संबंधित असल्याने त्यावर निर्बंध लादता येणार नाहीत. टेलिमार्केटिंग कंपन्यांकडून प्रचंड प्रमाणात अनावश्यक एसएमएस पाठवण्याच्या वृत्तीवर निर्बंध आणण्यासाठी ट्रायने गेल्या सप्टेंबरमध्ये एका दिवसात जास्तीत जास्त 100 एसएमएस पाठवण्याची मुभा दिली होती. गेल्या वर्षी ट्रायने ही मर्यादा वाढवली होती.
एका दिवसात केवळ २०० एसएमएस पाठवता येत होते. हा आदेश २७ सप्टेंबरपासून २०११ पासून लागू करण्यात आला होता. हा आदेश रद्द ठरविण्यात आल्यामुळे दिवसभरात ग्राहक पाहिजे तेवढे एसएमएस करू शकतील.
स्क्रीनचा रंग सांगेल एसएमएस चांगला की वाईट!
तणावमुक्त राहण्यासाठी रंगीत एसएमएस