आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Vegetables Prices May Further Push Retail Inflation ‎

भाज्या कडाडणार;विकास दराच्या घसरगुंडीचीही शक्यता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अपु-या पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. टोमॅटो, बटाटा यांचा भाव वधारणार असल्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यातील मध्यावरील स्थितीच्या तुलनेते भाजीपाला कडाडणार आहे.
ऑगस्ट उजाडला तरी देशात पावसाचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे स्थिती वाईट होत चालली आहे. आतापर्यंत देशात केवळ 19 टक्के एवढाच पाऊस झाला आहे. ऑगस्टमध्ये तरी चांगला पाऊस पडेल, असे अपेक्षित आहे. परंतु तरीदेखील सप्टेंबरमध्ये अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
दिल्लीमध्ये सध्या बटाटे 20 रुपये किलो असे आहेत. टोमॅटो 40 रुपये किलो आहेत. दिल्लीत ते आता 50 रुपयांवर पोहचले आहेत. मात्र कांद्याचे दर 10 ते 15 रुपये किलो असे होते. तेच आता 20 ते 25 रुपये किलो असे झाले आहेत. जून महिन्यात पाऊसमानात घट झाल्याने खरिपातील बटाट्याचे उत्पादन घटले आहे. बटाट्याचे मुख्य उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकात ते निम्म्यावर आले आहे. पाऊस कमी झाल्याने खरीप दहा टक्क्यांनी घटले आहे. यंदा खरिपाची लागवड 7 कोटी 40 लाख हेक्टर्स परिसरात आहे. गतवर्षी ती 8 कोटी 20 लाख हेक्टरवर झाली होती. आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम लवकर हाती घेतला गेला नाही तर विकास दर सहा टक्क्यांहून खाली जाईल, असे भाकीत राष्ट्रीय वाहतूक विकास समितीने व्यक्त केले आहे.
मंत्रिगटाची बुधवारी बैठक - दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिगटाची 8 ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. सरकारी पातळीवर या प्रश्नी हालचाली वाढल्या आहेत. कृषिमंत्री शरद पवार यांनी नुकताच महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, पुण्याचा दौरा करून दुष्काळी भागाची पाहणी केली. मंत्रिगटाच्या बैठकीनंतर ते पंजाब, हरियाणाचाही दौरा करतील. याअगोदर 31 जुलै बैठक झाली होती. या बैठकीत दुष्काळी भागासाठी दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. खरिपातील पीक वाचवण्यासाठी डिझेलवर निम्मे अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते.
कपाशीत 12% घट - नवी दिल्ली । देशातील कपाशीच्या उत्पादनात या हंगामात 12 टक्क्यांनी घट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा देशात कापसाच्या सुमारे तीन कोटी गाठी तयार होतील.
कपाशीचे उत्पादन व निर्यातीमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. 2011-12 या काळात भारतात (ऑगस्ट-जुलै) 3 कोटी 40 लाख गाठी तयार झाल्या होत्या. प्रत्येक गाठीमध्ये 170 किलो कापूस असतो. एप्रिलमध्ये करण्यात आलेल्या पहिल्या अहवालात या हंगामात 3 कोटी 20 लाख गाठींचा अंदाज लावण्यात आला होता. परंतु त्यात आणखी घट होईल, असा अंदाज आता लावण्यात येत आहे.
देशात गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटकातील ठरावीक भागात कपाशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. देशात सरासरी 20 टक्के एवढाच पाऊस आतापर्यंत झाल्याने दुष्काळसदृश स्थिती आहे.