आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मंडी (हिप्र)- हलाखीच्या परिस्थितीवर मात करून मॅरेथॉनमध्ये उत्तम कामगिरी करणार्या रिता ठाकूर या धावपटूला हिमाचल सरकारचा ‘बेटी है अनमोल’ पुरस्कार दिला जाणार आहे. 2 जूनपासून मंडी येथे सुरू झालेल्या ग्रीष्मोत्सवाच्या समारोप समारंभात मंत्री राजीव बिंदल यांच्या हस्ते तिला गौरवण्यात येणार आहे. आठशे रुपये भाडे असलेल्या घरात रिता राहत असून दक्षिण कोरियात होणार्या आशियाई खेळांची तयारी ती सध्या करीत आहे.
प्रायोजक मिळावा : हजारांवर धावपटूंना प्रशिक्षण देणारे कोच भूपेंद्रसिंग म्हणाले की, ती उत्तम धावपटू आहे. आशियाई स्पर्धेत तिच्याकडून अपेक्षा आहेत. रिताला प्रायोजक मिळाल्यास आणखी बळ येईल.
15 किलोमीटर रोज
आशियाई खेळांमध्ये 10 हजार मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे तिचे ध्येय आहे. त्यासाठी ती दररोज 15 किलोमीटर धावण्याचा सराव करते.
कारकीर्दीचा आलेख
> 2007 मध्ये ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियन
> नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये दहा हजार मीटरमध्ये कांस्यपदक
> 2008 साली इंडिया इंटर युनिव्हर्सिटीत कांस्यपदक
> 2010 मध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटीत रौप्यपदक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.