आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमल हासन यांची तक्रारी‍नंतर ‘विश्वरूपम’प्रकरणी सीसीआयचा तपास सुरु

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विश्वरूपम चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काळात स्पर्धेला मारक कृती केल्याच्या प्रकरणात कॉम्पीटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) तपासास सुरुवात केली आहे. अभिनेता कमल हासन यांच्या तक्रारीवर हा तपास सुरू आहे. हासन यांच्या तक्रारीनंतर सीसीआयच्या महासंचालकांनी 60 दिवसांत तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासाचा अंतिम अहवाल या महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. ही तक्रार कमल हसन यांच्या राजकमल फिल्म या फर्मने केली आहे.

काय आहे तक्रार
विश्वरूपमचे प्रदर्शन डीटीएचवरून होणार असेल तर कोणत्याही थिएटरमध्ये त्याचे प्रदर्शन करता कामा नये, असे फर्मान थिएटर संघटनेकडून काढण्यात आले होते, अशा निर्णयाचा परिणाम निकोप स्पर्धेवर होत असतो. अशी कृती कोणालाही करता येऊ शकत नाही, असे तक्रारीत म्हटले होते.