आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकीच्या ताजवर राहिले आहे भारतीय संघाचे राज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवून अमेरिका जरी सर्वोच्च स्थानी असली, तरी हॉकीच्या मैदानावर प्रदीर्घ काळापासून भारतीय संघ आपले वर्चस्व गाजवत आहे. भारताने आतापर्यंत 8 वेळा सुवर्ण, 1 वेळा रौप्य व 2 वेळा कांस्यपदके पटकावण्याचा विक्रम केला आहे. कोणत्याही देशाला हॉकीमध्ये अशा प्रकारे पदके मिळालेली नाहीत. आॅलिम्पिकमध्ये भारताने 20 पदके मिळवलेली आहेत. यामध्ये सर्वाधिक पदके हॉकीमधील आहेत. मात्र, 1980 पासून हॉकीमध्ये भारताचा हा पदके मिळवण्याचा सिलसिला खंडित झाला. बीजिंग आॅलिम्पिकसाठी हॉकी संघाला पात्रता पूर्ण करता न आल्याच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. मात्र, यंदाच्या संघामध्ये पदक जिंकण्याचा उत्साह व आत्मविश्वास आहे, असा विश्वास प्रशिक्षक मायकल नोब्स यांना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारताला सुवर्णपदक मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
अमेरिकेपेक्षाही सरस! - आॅलिम्पिकच्या इतिहास चाळला असता सर्वाधिक पदके अमेरिकेने मिळवली आहेत. अमेरिकेने 25 आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊन 929 सुवर्ण, 729 रौप्य व 638 कांस्यपदके आपल्या नावे केली आहेत. मात्र, हॉकीच्या मैदानावर हा बलाढ्य संघ सपशेल अपयशी ठरला आहे. आतापर्यंत अमेरिकेला हॉकीमध्ये केवळ दोन पदके मिळवता आली. 1932 मध्ये भारताने अमेरिकेला लॉस एंजलिस आॅलिम्पिक स्पर्धेच्या फायनलमध्ये 24-1 अशा मोठ्या फरकाने धूळ चारली होती. या वेळी केलेल्या कामगिरीचे अमेरिकन संघाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर एकदाही अमेरिकेला हॉकीच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही.
2 वेळा केली विक्रमाची हॅट्ट्रिक - आॅलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे आतापर्यंतचे प्रदर्शन सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे आहे. भारताने आतापर्यंत दोन वेळा सुवर्णपदक पटकावण्याची हॅट्ट्रिक केली आहे. संघाने 1928 (अ‍ॅस्टरडॅम), 1932 (लॉस एंजलिस), 1936 (बर्लिन) अशी आॅलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा सुवर्णपदके मिळवली. त्यानंतर हीच कामगिरी भारताने 1948 (लंडन), 1952 (हेलसिंकी) व 1956 (मेलबर्न) येथील स्पर्धेत सुवर्ण मिळवून विक्रमाची हॅट्ट्रिक साधली. त्यानंतर 1960 मध्ये रोम येथे झालेल्या आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने भारताने 1964 मध्ये टोकियो येथील आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकावर बाजी मारली. 1968 मध्ये मेक्सिको व 1972 मध्ये म्युनिच आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्य मिळवता आले. 1980 मध्ये भारताने पुन्हा मॉस्को येथील स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताचे हे शेवटचे पदक ठरले.