आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Rape Offender On Rajya Sabha\'s Dupty Chariman? A Mother Ask Question In Keral

राज्यसभा उपसभापतीपदी बलात्काराचा आरोपी कसा? केरळमधील आईचा सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरूवनंतपुरम- काँग्रेस सरकारने महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या विरुद्ध राज्यसभेत विधेयक मांडले आहे, परंतु पी.जे. कुरियन यांच्यासारखी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी व्यक्ती सभागृहाच्या उपसभापतिपदावर कशी राहू शकते, असा संतापजनक सवाल केरळ वासनाकांडातील पीडिताच्या आईने उपस्थित केला आहे. त्या आशयाचे पत्र त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवले आहे.

1996 मधील या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्या पार्श्वभूमीवर पीडिताच्या 70 वर्षीय आईने सोनिया आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्याकडे फॅक्स करून आपली भावना व्यक्त केली. एक आई म्हणून तुम्ही आमच्या वेदना निश्चितपणे समजू शकाल. ते (कुरेन) राज्यसभेच्या खुर्चीवर कसे बसू शकतात, ही गोष्ट मला चकीत करणारी आहे. तुमचा पक्ष महिलांवरील लैंगिक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काम करत आहे. दुसरीकडे मात्र संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ते जबाबदार पदावर आहेत. हा विरोधाभास आहे. त्याचा परिणाम पक्षाच्या देशभरातील प्रतिमेवर होऊ शकतो, असा इशारा पीडिताच्या आईने दिला आहे.

काय आहे प्रकरण
1996 च्या जानेवारीमध्ये 16 वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले होते. त्यानंतर सतत 40 दिवस तिच्यावर 42 जणांनी तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात कु रियन यांचे नाव होते, परंतु कुरियन यांनी हा आरोप फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आपल्याला निर्दोष ठरवल्याचे कुरियन यांचे म्हणणे आहे.

माकपचा गोंधळ- सूयनेल्ली प्रकरणी केरळ विधानसभेत माकपप्रणीत डाव्या लोकशाही आघाडीने गुरुवारी सभागृह डोक्यावर घेतले. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. सूर्यनेल्ली प्रकरणात कुरियन यांची फेर चौकशी करण्याची मागणी डाव्या आघाडीने लावून धरली आहे. केरळातील काँग्रेस सरकारप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीने ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळे विरोधकांनी राज्यात आंदोलन केले.