आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात हज यात्रेकरूंच्या यादीत घोटाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशात हज यात्रेकरूंची यादी तयार करताना त्यात मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या यादीत ज्यांनी हजसाठी अर्जही केला नव्हता अशी 18 तर ज्यांची नावे प्रतीक्षा यादीत होती अशी 152 नावे मुख्य यादीत आढळली आहेत.
या घोटाळ्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 27 प्रवाशांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे अल्पसंख्याक कल्याण व हजमंत्री मोहम्मद आजम खान यांनी हज यात्रेकरूंच्या यादीत अनेक नावे बनवेगिरी करून टाकण्यात आली आहे. या घोटाळ्यात मुंबई व दिल्ली येथील एजन्सीजही सामील आहेत. त्यामुळे त्याची चौकशी केली जाईल.
वेबसाइट हॅक करून बदलली नावे: हज कमिटीची वेबसाइट हॅक करून यात्रेकरूंच्या यादीत खाडाखोड करण्यात आली आहे. हॅक झालेले आयपी अँड्रेस मुंबई, बंगळुरू व लखनऊचे असून यादीत फेरबदल 17 मे ते 29 जून या काळात झाले आहेत.