आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचे अघोरीकृत्य : चारित्र्यावर शंका घेऊन पत्निला पाजले मूत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - पश्चिम बंगालच्या विश्वभारती परिसरातील एका शाळेतील विद्यार्थीनीला स्वमुत्र प्राशनाची शिक्षा करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच येथील एका नराधम पतीने स्वतःच्या पत्निवर चारित्र्याचा संशय घेऊन तिला स्वतःचे मूत्र पाजण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
या पिडित महिलेचा नवरा तिच्यावर नेहमी संशय घेत असे. तिला अपमानित करण्यासाठीच तो तिच्या सोबत हे घाणेरडे कृत्य करत होतो. महिलेने त्याला नकार दिल्यास तिला मारहाण केली जात होती. तसेच सासरच्या मंडळीकडून तिचा हुंड्यासाठीही छळ होत होता.
लग्न झाल्यानंतर काही दिवसापासूनच पिडित महिलेच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. ती वेश्या असल्याचाही तिच्यावर आरोप करण्यात आला. घर-परिसरातील कोणत्याही पुरुषासोबत तिला बोलण्याची परवानगी नव्हती. तिच्या प्रत्येक फोन कॉल्सनंतर कॉल्सची डिटेल्स तपासली जात होती. शेजारी राहणा-या पुरुषांसोबत तिचे नाव जोडून भर रस्त्यावर तिला बेइज्जत केले जात होते. यासर्व छळाने त्रस्त पिडीत महिला सध्या माहेरी राहात असून न्यायासाठी झगडत आहे.
शांतीनिकेतनमध्ये हॉस्टेलच्या वॉर्डनने विद्यार्थिनीला पाजले मूत्र!
हुंड्यासाठी डॉक्‍टर पतिने पत्‍नीला बळजबरीने पाजले मूत्र