आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंड्यासाठी डॉक्‍टर पतिने पत्‍नीला बळजबरीने पाजले मूत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - पश्चिम बंगालमध्ये मुलीला स्वमूत्रप्राशनाची सक्ती करण्याचे प्रकरण ताजे असतानाच, हुंड्यासाठी बंगळुरुच्‍या एका उच्‍च शिक्षित डॉक्‍टरनेच पत्नीवर स्वमूत्रप्राशनाची बळजबरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्राप्‍त माहितीनुसार, व्‍यवसायाने डेंटीस्‍ट असलेल्‍या आकाश राज याच्‍याविरोधात पत्‍नी सपना हिने तक्रार दाखल केली आहे. उडुपी जिल्‍ह्यातील सुब्रमण्‍यमनगर येथे आकाश राज राहतो. आकाशने हुंड्यापोटी 1 किलो सोने, 5 किलो चांदी घेतली. लग्‍नानंतर त्‍याने आणखी 25 लाख रुपयांची मागणी केली. त्‍यासाठी त्‍याने व त्‍याच्‍या कुटुंबियांनी सपनाचा छळ सुरु केला. सपनाने दिलेल्‍या तक्रारी म्‍हटले आहे की, आकाश तिच्‍यावर सतत संशय घ्‍यायचा. लग्‍नापूर्वी ती वेश्‍याव्‍यवसायात गुंतली होती, असा आरोप त्‍याने लग्‍नाच्‍या दुस-याच दिवशी केला होता. घरात काम करण्‍यासाठी येणा-या इलेक्ट्रिशियनसोबतही तिचे संबंध होते, असा आरोप आकशने केला होता. एवढेच नव्‍हते तर शेजारच्‍या पुरुषांसोबतही तिचे अनैतिक संबंध होते, असा आरोपही त्‍याने केला होता. तो इतर महिलांसोबतही अश्लिल भाषेत संवाद साधायचा. मी दिसायला कुरुप असल्‍याचे सांगून त्‍याने तिचा अपमान केला. त्‍याचा छळ एवढ्यावरच थांबला नाही तर मासिक पाळीदरम्‍यानही त्‍याने बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्‍थापित केला आणि त्‍याचे मूत्र प्राशन करायला लावले.
सपना तक्रारीत म्‍हणते, हा सर्व छळ हुंड्यासाठी होता. मी दोन वेळा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. मी कंटाळून माहेरी गेले. परंतु, त्‍याचे समाधान झाले नाही. तो माझ्या माहेरी आला आणि माझ्या पोटावर जोरात लाथ मारली. मी गर्भवती होते. त्‍याने मारल्‍यामुळे गर्भपात झाला. आता त्‍याचे कुटुंबिय त्‍याच्‍यासाठी दुस-या मुलीच्‍या शोधात आहेत. त्‍याने मला ठार मारण्‍याचीही धमकी दिल्‍याचे सपनाने म्‍हटले आहे.
पश्चिम बंगालमध्‍ये मुलीवर अत्‍याचारप्रकरणी पंतप्रधानांना नोटीस
शांतीनिकेतनमध्ये हॉस्टेलच्या वॉर्डनने विद्यार्थिनीला पाजले मूत्र!
डॉक्टर पतीकडून डॉक्टर पत्नीचा गर्भपातासाठी छळ
कंडोम वापरण्याची मागणी म्हणजे मानसिक छळ नाही - हायकोर्ट