आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिहारमधून दोघांना उचलले; हैदराबाद स्फोटाची सुई तोयबाच्या हाफीज सईदवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद, नवी दिल्ली- 26-11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि पूर्वाश्रमीच्या लष्कर ए तोयबाचा म्होरक्या (आताची जमात उद दवा) हाफीज सईद हाच गेल्या आठवड्यातील हैदराबाद बॉम्बस्फोटामागचा सूत्रधार असावा, असा संशय गुप्तचरांना वाटतो आहे. गुप्तचर संघटनांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुला फासावर लटकवल्यानंतर पाकिस्तानातील मुरडिके गावात दहशतवादी संघटनांच्या युनायटेड़ जिहादी कौन्सिलची बैठक झाली होती. या बैठकीत सईदने भारताविरुध्द प्रक्षोभक भाषण केले होते.त्या बैठकीतच हैदराबादेतील स्फोटाचे कारस्थान रचण्यात आले असावे असा गुप्तचर संघटनांचा कयास आहे. दरम्यान, हैदराबादेतील दोन स्फोटांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) अद्यापही काही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. एनआयएने शुक्रवारी इंडियन मुजाहिदीनच्या दोन संशयितांना तिहार तुरुंगातून उचलून हैदराबादेत आणले होते.सय्यद मक बूल आणि इम्रानखान अशी या संशयितांची नावे असून त्यांनी दिलसुखनगरची रेकी केल्याचे सांगितले जाते. या दोघांची गुप्तचरांनी सखोल चौकशी केली. 21 फेब्रवारी रोजी े दिलसुखनगर दोन बॉम्बस्फोटांनी हादरले होते.या स्फोटांमध्ये 16 ठार तर 117 जण जखमी झाले होते.