Home »National »Other State» Hyderabad Blasts Update

बॉम्‍बस्‍फोटापूर्वी आणि नंतर हैदराबादमधून करण्‍यात आले 812 फोनकॉल्‍स

वृत्तसंस्‍था | Feb 24, 2013, 11:12 AM IST

  • बॉम्‍बस्‍फोटापूर्वी आणि नंतर हैदराबादमधून करण्‍यात आले 812 फोनकॉल्‍स

हैदराबाद- हैदराबाद येथील दिलसुखनगरमधील बॉम्‍बस्‍फोटाची जेहाद काऊंसिलकडून क्षणाक्षणाची माहिती करून घेण्‍यात येत होती. गुप्‍तचर विभागाकडून मिळालेल्‍या माहितीनुसार स्‍फोटापूर्वी आणि नंतर हैदराबादमधून पाकिस्‍तान, बांगलादेश आणि आखाती देशांमध्‍ये 812 कॉल्‍स करण्‍यात आले होते. हे सर्व कॉल्‍स 6.30 ते 7.30 दरम्‍यान इंडियन मुजाहिदीन आणि हुजीच्‍या ठिकाणांवर करण्‍यात आले.

दिलसुखनगरमध्‍ये पहिला स्‍फोट 6.58 वाजता आणि दुसरा स्‍फोट 7.01 वाजता झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार यामधील 88 कॉल्‍स हे पाकिस्‍तानातील इस्‍लामाबाद आणि कराची येथे करण्‍यात आले होते. तर 18 कॉल्‍स हे पीओके (पाकव्‍याप्‍त काश्‍मीर) येथील मुझप्फराबाद येथे करण्‍यात आले होते. यामधील 48 कॉल्‍सचा कालावधी 10 मिनिटांपेक्षा जास्‍तीचा होता. गुप्‍तचर विभागांना 28 संशयित नंबर मिळाले आहेत. त्‍याची राष्‍ट्रीय गुप्‍तचर यंत्रणांकडून (एनआयए) तपासणी करण्‍यात येत आहे.

Next Article

Recommended