आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I May Put Up A Token Fight Against Gadkari, Mahesh Jethmalani Says

भाजपचे अध्यक्षपद : नितीन गडकरींच्या विरोधात मी लढेन- महेश जेठमलानी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे नेते महेश जेठमलानी यांनी आपण पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिल्याचे वृत्त आहे. जर भाजपच्या पक्षाध्यक्षपदी नितीन गडकरी जर अर्ज भरणार असतील तर आपण अर्ज दाखल करु, असे वृत्तांत म्हटले आहे.
मी भाजप अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याबाबत निर्णय अजून घेतला नाही पण जर नितीन गडकरी यांनी अर्ज दाखल केला तर मी त्याचा नक्की विचार करेन, असे पत्रकारांशी बोलताना जेठमलानी यांनी म्हटले आहे.
महेश जेठमलानी यांनी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. तसेच गडकरी यांचे पूर्ती कंपनींशी संबंध असल्याने व तेथे भ्रष्टाचार झाल्याने पक्षाची बदनामी होत असल्याचे सांगून गडकरींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. तसेच त्यांना यासाठी यशवंत सिन्हा व शत्रूघ्न सिन्हा यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी रविवारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यासाठी बुधवारी (२३ जानेवारी) सकाळी ११.३० वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येऊ शकतो. तसेच अर्ज माघारी घेण्यासाठी एक तासाचा अवधी दिला जातो. एकच अर्ज आला तर बिनविरोध निवडणूक जाहीर केली जाते. मात्र, एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास पक्षातंर्गत निवडणूक घेतली जाते. दरम्यान, नितीन गडकरी यांची बिनविरोध निवड होईल, असे भाजपमधील नेत्यांचे म्हणणे आहे.