आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात मी सुरक्षितच, फुकटचे सल्ले नको :शाहरूख खान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/इस्लामाबाद - अभिनेता शाहरुख खानला सुरक्षा पुरवण्याबाबत पाकचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी भारताला दिलेल्या सल्ल्यावर केंद्र सरकारसह सर्व पक्षांनी टीका केली. भारत आपल्या नागरिकांना सुरक्षा पुरवण्यात सक्षम आहे. मलिक यांनी आधी आपल्या देशाकडे पाहावे, उगा सल्ले देत बसू नये, असे सर्वांनी प्रत्युत्तर दिले. रात्री उशिरा शाहरुखने स्पष्टीकरण दिले. मी माझ्या देशात सुरक्षित आहे. इतर कुणाला काळजी करण्याची गरज नसल्याचे तो म्हणाला.

शाहरुखच्या एका वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देत मलिक म्हणाले होते की, भारताने त्याला सुरक्षा पुरवली पाहिजे. प्रत्युत्तरादाखल मंगळवारी केंद्रीय गृहसचिव आर.के. सिंह म्हणाले, आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्हाला आगाऊ सल्ल्यांची गरज नाही.
काँग्रेस प्रवक्ते राशिद अल्वी म्हणाले, शाहरुखला भारतीयांनीच मोठे केले. त्याच्या सुरक्षेसाठी सरकार सक्षम आहे. भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनीही पाकिस्तानने आधी आपले घर सांभाळावे, असे म्हटले. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, सध्या शाहरुखपेक्षा कमल हसन यांना ‘विश्वरूपम’साठी सुरक्षेची गरज आहे. यानंतर शाहरुखने सांगितले की, माझ्या देशाचा मला अभिमान आहे, येथील लोकांनीच मला मोठे केले आहे.