आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या आंदोलनात मीदेखील असतो तर...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांनी सामूहिक बलात्काराच्या घटनेविरोधात उसळलेला जनक्षोभ योग्य ठरवला आहे. निदर्शनात सहभागी लोकांना मी सलाम करतो. मलाही आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र, तसे होऊ शकले नाही. इंडिया गेटवरील निदर्शनादरम्यान माझ्या नातेवाइकालाही मारहाण झाली, असे कबीर म्हणाले.

कौटुंबिक हिंसाचारात महिलांच्या सुरक्षेसंबंधात सोमवारी एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये न्या. कबीर म्हणाले, त्या दिवशी जे झाले, त्यात नवे काही नव्हते. प्रशासनाला लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. सामूहिक बलात्काराविरोधात दिल्लीतील झालेली निदर्शने तर्कसंगत होती, हे मी याआधीही म्हटले आहे. ते आवश्यकच होते, असे न्या. कबीर म्हणाले. 16 डिसेंबर रोजीची घटना एका महिलेशी नव्हे तर संपूर्ण महिला समाजाशी संबंधित आहे. या घटनेचा फायदा वेगळ्या मानसिकेतच्या लोकांनी वा गटाने घेतला नाही, असे न्या. कबीर यांनी सांगितले.