आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Hemraj\'s Head Not Returned, Bring 10 Heads From Pak Says Swaraj

...तर एकाच्‍या बदल्‍यात पाकमधुन 10 शिर आणाः सुषमा स्‍वराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खैरीआर- शहीद जवान हेमराज याचे शिर पाकिस्तानने परत न केल्‍यास 10 पाकिस्‍तानी सैनिकांचे शिर आणा, असे लोकसभेच्‍या विरोधी पक्षनेत्‍या सुषमा स्‍वराज यांनी ठणकावून सांगितले. स्‍वराज यांनी केंद्र सरकारकडे पाकिस्‍तानविरुद्ध कडक कारवाई करण्‍याची मागणी केली आहे.

सुषमा स्‍वराज यांनी काल भाजपचे अध्‍यक्ष नितीन गडकरी आणि राजनाथसिंह यांच्‍यासह हेमराजच्‍या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्‍वन केले. त्‍यावेळी त्‍या म्‍हणाल्‍या, पाकिस्तानला कोणतेही प्रत्युत्तर न देता आपण केवळ चर्चाच करत राहायची का, हा खरा प्रश्‍न आहे. सरकारने कोणत्‍या तरी पद्धतीने पाकिस्‍तानला उतर दिले पाहिजे. देशाचे लक्ष सरकारकडे कमकुवत सरकार असल्याचे देशासमोर सिद्ध होऊ नका. त्यांनी सीमा पार करुन आपल्‍या सैनिकांची हत्‍या करुन त्‍यांचे शिर घेऊन गेले. हे सहन करणे अशक्‍य आहे, असे स्‍वराज म्‍हणाल्‍या. सरकारने शहिदाचा अनादर केल्‍याचा आरोपही स्‍वराज यांनी केला. सरकारने शहिदांच्‍या कुटुंबियांची माफी मागावी, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.