Home »National »Other State» IITians Filmmaker

नव्या भूमिकेत आयआयटीयन्स, नासाचे शास्त्रज्ञ; आता चित्रपटनिर्माते

दिव्य मराठी नेटवर्क | Feb 24, 2013, 04:32 AM IST

कोलकाता - ‘चटगाव’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनामुळे वेदव्रत यांना प्रसिद्धी मिळाली. गेल्या वर्षअखेर तो प्रदर्शित झाला, पण जगाला त्यांची आणखी एक ओळख आहे. या माणसाने फोटोग्राफीचे जगच बदलून टाकले. 1995 मध्ये त्यांनी जगातील सर्वात छोटा कॅमेरा तयार केला, जो सध्या प्रत्येक मोबाइल फोनपासून अंतराळातील दुर्बिणीतही वापरला जातो.
87 पेटंट मिळवणारे पेन चित्रपट दिग्दर्शनाकडे कसे वळले, हे ऐकणे रंजक आहे. वेदव्रत सांगतात की, ‘आधीपासूनच मला परफॉर्मिंग आर्टचा छंद होता. कोलंबिया विद्यापीठात संशोधनादरम्यान होस्टेलमधून पळून जाऊन विद्यापीठातील थिएटर गाठत होते. वाटत होते की, पीएच.डी. कधी पूर्ण होऊ नये आणि थिएटर असेच सुरू राहावे. संशोधन पूर्ण केल्यानंतर नासामध्ये नोकरी केली’. 15 वर्षांत त्यांनी शेकडो शोध लावले, पण मनात कुठे ना कुठे थिएटर होते. 2008 मध्ये नासाची नोकरी सोडली. संपूर्ण अनुभव सिनेमोटोग्राफीपर्यंतच मर्यादित ठेवला आणि इथेच सुचली चित्रपट दिग्दर्शनाची कल्पना. स्वत:च्या फिल्म सेटवर 300 चित्रपट पाहिले आणि बनवला ‘चटगाव’.

वेदव्रत पेन
० आयआयटी खरगपूर
० 15 वर्षांपासून नासामध्ये संशोधन
० 87 पेटंट मिळवले
० सध्या चित्रपटनिर्माते

Next Article

Recommended