आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवामान खात्याचे कटू सत्य : अब्ज-खर्व खर्च, 40 % अंदाज बरोबर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हवामान खात्याने आतापर्यंत कधीही मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा किंवा संकटांचा योग्य अंदाज सांगितला नाही. 1988 पासून आत्तापर्यंत विभागाने केवळ नऊ वेळा मानसूनचा योग्य अंदाज बांधला आहे. म्हणजेच यश फक्त 40 टक्के.
हवामानाचा कौल समजण्यात विभागाला या वर्षीही अपयश आले. अपयशाचे खापर यंत्रणेच्या अभावावर फोडले जात आहे. 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धांदरम्यान हवामान विभागाला हायटेक करण्यासाठी 1000 कोटी रुपये देण्यात आले होते. विभागात सुपर कंप्युटर्स आले. मात्र जाणकार तंत्रज्ञ नाहीत. हवामान विभागाचे डीजी एल.एस. राठोड सांगतात की,‘ हवामानासंबंधी माहिती मिळवण्यासाठी विभागाला 60 रडार पाहिजेत. सध्या 15 आहेत.’ मात्र कृषि तज्ज्ञ देवेंद्र शर्मा म्हणतात की,‘आपल्याकडे चांगल्या हवामानतज्ज्ञांची उणीव आहे.अमेरिकेच्या हवामान विभागाने या वर्षीच्या भयंकर दुष्काळाचा अंदाज 2010 मध्येच वर्तवला होता.’
अंदाज चुकल्यास आफ्रिकेत होते शिक्षा - दक्षिण अफ्रिकेत हवामानाचा अंदाज सांगणा-यांना इशारा देण्यात आला आहे की, माहिती चुकल्यास जेल किंवा नुकसान भरपाईची शिक्षा देण्यात येईल. बेल्जियममध्येही अंदाज चुकल्यास विभागातील अधिका-यांना दंड ठोठावण्याची मागणी केली जात आहे.