आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील पुस्‍तक प्रदर्शनात सर्व काही पुस्‍तकांच्‍याच अवतारात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पुस्तकांनी भरलेले आयफेल टॉवर किंवा पुस्तकांनी भरलेली दरी किंवा पुस्तकांच्या रूपात पडणारा पथदिव्याचा प्रकाश, अशी कल्पना आपल्यापैकी अनेक पुस्तकवेड्यांनी केली असेल. नवी दिल्लीत प्रगती मैदानावर भरलेल्या पुस्तक मेळ्यात या कल्पना सत्यात उतरल्या असून वाचकांना आकर्षित करण्यातही या कल्पना
यशस्वी ठरल्या आहेत. नॅशनल बुक ट्रस्ट आणि दिल्लीच्या कॉलेज ऑफ आर्ट्समधील विद्यार्थ्यांनी या कल्पनांना मूर्त रूप दिले आहे.

नॅशनल बुक ट्रस्टचे रिसर्च अँड इनोव्हेशन विभागाचे प्रोजेक्ट इन्चार्ज कुमार विक्रम यांनी वाचकांना पुस्तकांकडे आकर्षित करण्यासाठी विविध कल्पना राबवल्याचे सांगितले. विदेशांमध्ये पुस्तक प्रदर्शनात अशा कल्पना नेहमीच राबवल्या जातात. मात्र, देशात अशा प्रकारचे हे पहिलेच प्रदर्र्शन असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनात पुस्तकरूपी प्रकाश दाखवणारे ‘लाइट ऑ फ लाइफ’, पुस्तकांच्या रूपात व्यक्त होणारे विचार दाखवणारी ‘द आयडिया बल्ब’, ज्ञानाचे प्रतीक असलेल्या श्वेतकमळाच्या रूपातील ‘एव्हरग्रीन पाँड’, रात्रशाळेचे
प्रतीक असलेल्या ‘द नाइट स्कूल’ या विविध प्रतीकांमध्ये येथे पुस्तके रचून ठेवली आहेत.