आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलैत 17 लाख मोबाइलधारकांची भर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- यंदा जुलै महिन्यात जीएसएसम मोबाइल कंपन्यांनी 17 लाख नव्या ग्राहकांना आपल्या नेटवर्कमध्ये जोडले आहे. देशातील एकूण जीएसएम मोबाइलधारकांची संख्या 67.90 कोटींवर पोहोचली आहे. एअरटेलने सर्वाधिक ग्राहकांच्या संख्येत भर घातली आहे.
सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सीओएआय) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात यूनिनॉर आणि व्हिडिओकॉनच्या ग्राहकांचा संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत या कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या वाढली होती. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या परवान्यांत यूनिनॉर आणि व्हिडिओकॉनचाही समावेश होता.
जुलै 2012 दरम्यान भारती एअरटेलने सर्वाधिक 15 लाख नव्या ग्राहकाला आपलेसे केले आहे. कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या 18.88 कोटींवर पोहोचली आहे. सध्या एअरटेलची बाजारातील हिस्सेदारी 27.80 टक्क्यांवर पोहोचली आहे. या कालावधित देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन इंडियाच्या ग्राहक संख्येत 12 लाख ग्राहकांची भर पडली आहे. देशभरात वोडाफोनचे एकूण 15.49 कोटी ग्राहक आहेत. जुलैअखेर कंपनीची बाजारातील एकूण हिस्सेदारी 22.81 टक्क्यांवर पोहोचली आहे. जीएसएम बाजारात 17.32 टक्के वाटा असलेल्या आयडिया सेल्यूलरने जुलैमध्ये 4.5 लाख नवे ग्राहक जोडले. कंपनीची ग्राहक संख्या 11.72 कोटींवर पोहोचली. जुलैत सर्वाधिक फटका यूनिनॉरला बसला. महिन्याअखेरीस 4.45 कोटी ग्राहकांनी यूनिनॉरच्या सेवेला रामराम ठोकला आहे. व्हिडिओकॉन नेटवर्कमधून 4.41 लाख ग्राहकांनी काढता पाय घेतला आहे. यामुळे कंपनीची ग्राहक संख्या 51.6 लाखांवर घसरली. दोन्ही कंपन्यांसह डीबी, एस्टिसालात, एसटेल व एसएसटीएलसारख्या नव्या कंपन्यांना आगामी स्पेक्ट्रमच्या लिलावात भाग घ्यावा लागेल. या कंपन्यांचे परवाने 7 सप्टेंबर 2012पर्यंत वैध आहेत.
सरकारच्या अखत्यारीतील बीएसएनएल व एमटीएनएल कंपन्यांची जुलैतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. बीएसएनएलला या महिन्यात एकाही ग्राहकाने जवळ केले नाही. दुसरीकडे एमटीएनएलमधून 90 हजार ग्राहकांनी दुसरे नेटवर्क जवळ केले आहे.