आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Income Tax Issue Comment On Union Finance Minister P Chidambaram

करचोरी करणार्‍यांना माफी नाही : चिदंबरम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- करचोरी करणार्‍यांना अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. अशा लोकांना माफी देण्याची कोणतीही योजना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर चोरीचा छडा लावण्यासाठी आकडेवारी जमवण्यात येत आहे.
आता जवळपास सर्व विवरणपत्रे ऑनलाइन भरली जात आहेत. आमच्याकडे व्यापक स्तरावरील आकडे आहेत. त्यांची छाननी करण्यात येत आहे. कृपया आपली मिळकत लपवून ठेवू नका. ती उघड करून कर भरा, असे माझे लोकांना आवाहन आहे, असे अर्थमंत्री म्हणाले.
अधिक उत्पन्न असलेला विशिष्ट वर्ग सोडून इतर कोणत्याही वर्गाच्या लोकांवर सरकारने अतिरिक्त कराचे ओझे बजेटमध्ये टाकलेले नाही. वार्षिक एक कोटी रुपयांची मिळकत असलेल्या 42,800 लोकांवरच 10 टक्के अधिभार लावण्यात आला असल्याचे चिदंबरम म्हणाले. या करवसुलीतून तिजोरीत सुमारे साडेतेरा हजार कोटींची भर पडणार आहे.