आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पेशालिस्ट डॉक्टरांना स्पेशल इन्क्रिमेंट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - सरकारी रुग्णालयांतील रुग्णांना स्पेशालिस्ट डॉक्टर मिळावेत यासाठी पंजाब सरकारने अशा डॉक्टरांना स्पेशल इन्क्रिमेंट देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांत स्पेशालिस्ट डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होणे अवघड झाले आहे. येथील रुग्णालयांमध्ये 547 डॉक्टरांची गरज असून आतापर्यंत फक्त 200 डॉक्टरांचीच नियुक्ती होऊ शकली आहे. आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव विनी महाजन यांनी सांगितले की, खासगी क्षेत्रात चांगले पॅकेज मिळत असल्यामुळे साहजिकच स्पेशालिस्ट डॉक्टरांचा तिकडे जास्त ओढा असतो. ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
राज्यातील औषधांच्या दुकानांत अंमली पदार्थ विकले जाण्याचीही मोठी समस्या असून आता एक हजार लोकसंख्या असलेल्या वस्तीतच मेडिकल स्टोअर उघडण्याची परवानगी देण्यात येईल, असेही महाजन यांनी सांगितले. सध्या 600 ते 800 लोकसंख्येच्या गावांमध्येही चार मेडिकल स्टोअर आहेत.