आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका मिनिटात उभारला पूल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली (पंजाब)- भारतीय सैन्य कशा प्रकारे शत्रूला जेरीस आणते हे दाखवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागवण्यासाठी बुधवारी शहीद उधमसिंह ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स, टंगोरी येथे सैन्याने विविध हत्यारे आणि उपकरणांचे प्रदर्शन मांडले होते.
नदी किंवा दरी पार करण्यासाठी एका मिनिटात पूल कसा तयार केला जातो याचे प्रात्यक्षिक या वेळी दाखवण्यात आले. या प्रदर्शनात बोफोर्स तोफा, टी-72 आणि टी-55 रणगाडे, सुरुंगरोधक वाहने, रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांची माहिती देण्यात आली.