आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत 500 ड्रोन खरेदी करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यलहंका एअरबेस - अमेरिकेप्रमाणेच मानवरहित ड्रोनसारखी अत्याधुनिक विमानांनी भारतही लवकरच सुसज्ज होणार आहे. पुढील पाच वर्षांत 500 मानवरहित लढाऊ विमाने (आर्ड यूएव्ही) खरेदी करण्याची तयारी सुरू आहे. इस्रायलच्या आयरन डोम नावाच्या हवाई व क्षेपणास्त्र संरक्षण सिस्टीम खरेदी करण्याचा भारताचा विचार आहे.
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमीटेडने युएव्ही निर्मीती करणा-या पाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून यासंबंधी प्राथमिक माहिती मागवली आहे. यामध्ये अमेरिकेची बोइंग,बेई सिस्टीम,लॉकहीड मार्टीन,इस्रायलची आयएआय आणि अ‍ॅबिट कंपन्यांचा समावेश आहे. भारताकडे सध्या 150 युएव्ही आहे.इस्रायलचे राजदूत अ‍ॅलोन युसपिज यांच्यामते संरक्षण साहित्य खरेदीत भारत-इस्रायलचे जुने संबंध आहेत.

रुस्तम 2 ची चाचणी पुढील वर्षी
भारताच्या स्वदेशी बनावटीच्या रुस्तम 1, निशांत, अयास आणि मायक्रो यूएव्ही ही लढाऊ विमाने आहेत. यापैकी रुस्तम 2 हे सुध्दा लढाऊ विमान असून त्याची पहिली चाचणी पुढील वर्षी फेब्रुवारीत करण्यात येणार आहे.