आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Still Remembers Attack On Parliament In 2001

PHOTOS: असा झाला होता संसदेवर हल्‍ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफजल गुरुला शनिवार 9 फेब्रुवारी 2013 रोजी फाशी देण्‍यात आली. तब्‍बल 12 वर्षांपूर्वी संसदेवर झालेल्‍या हल्‍ल्‍याप्रकरणी त्‍याला दोषी ठ‍रविण्‍यात आले होते. संसदेवर 13 डिसेंबर 2011 रोजी झालेला हल्‍ला आजही देशवासीयांच्‍या स्‍मरणात आहे. हा हल्‍ला अतिशय भीषण तर होताच. परंतु, या घटनेनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली.

संसदेवर हल्‍ला करणा-या दहशतवाद्यांनी सुरक्षा चक्र भेदून संसदेच्‍या आवारात प्रवेश मिळविला. संसदेत घुसुन खासदारांना ओलीस ठेवण्‍याची दहशतवाद्यांची योजना होती. सकाळी 11.40 वाजता हॅण्‍ड ग्रेनेड आणि एके 47 रायफल्‍ससह दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. त्‍यावेळी संसदेचे सत्र सुरु होते. सुरक्षेत झालेल्‍या चुकीनंतर सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना ठार केले आणि त्‍यांची योजना उद्ध्‍वस्‍त केली.

दहशतवादी ज्‍या कारमधुन संसदेमध्‍ये शिरले, त्‍यावर लाल दिवा तसेच गृहमंत्रालयाचे स्‍टीकर होते. सुमारे 15 मिनिटांपर्यंत दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. संरक्षण दलांनी 5 दहशतवाद्यांना कंठस्‍नान घातले. परंतु, या हल्‍ल्यात 9 जवान शहिद झाले. तर एका पत्रकाराचाहीमृत्‍यू झाला. या हल्‍ल्‍याचा कट रचणा-या अफजल गुरुसह 4 जणांना अटक करण्‍यात आली.

हल्‍ला झाला त्‍याच्‍या 40 मिनिटांपूर्वी संसदेची कारवाई तहकूब करण्‍यात आली होती. तत्‍कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी संसदेतून निघून गेल्‍या होत्‍या. परंतु, तत्‍कालीन गृहमंत्री लालकृष्‍ण अडवाणी यांच्‍यासह अनेक नेते संसदेतच उपस्थित होते. या नेत्‍यांना ओलीस ठेवण्‍याचा हा कट होता.

या हल्‍ल्याच्‍या आठवणींना उजाळा देणारी काही छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्‍लीक करा...