आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी रेंजर्सने पाहिले पाठवली मिठाई, नंतर सीमेवर गोळीबार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्वातंत्र्यदिनानिमीत्त मंगळवारी भारत-पाकिस्तान सीमेवर दोन्ही देशांकडून मिठाई वाटण्यात आली आणि काही तासातच पाकिस्तानी रेंजर्सकडून जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये भारतीय सीमेवर गोळीबार करण्यात आला. मागील ११ दिवासात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीकराराचे सातव्यांदा उल्लंघन करण्यात आले आहे. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले, सांबा सेक्टरमध्ये अंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या पनसार चौकीवर सीमेपलीकडून गोळीबार करण्यात आला. सीमेवर तैनात बीएसएफच्या जवानांनीही त्याच्या उत्तरात फायरिंग केले.
दुसरीकडे, पाकिस्तान आणि चीनलगत असलेल्या भारतीय सीमेवर १८ भुयार तयार केले जात आहेत. या भुयारातून सैनिकांना एका ठिकाणाहून दूस-या ठिकाणी जाण्यासाठी आणि क्षेपणास्त्र तसेच महत्त्वाचा शस्त्रसाठा करण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे शत्रुच्या सॅटेलाईट आणि ड्रोन हल्ल्याचाही धोका कमी होणार आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया'तील वृ्त्तानूसार सात भुयारांचे काम सुरु करण्यात आले आहे उर्वरित ११ भुयारांच्या कामाला परवानगी मिळणे बाकी आहे. जम्मु-कश्मिर, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात भूयार तयार केले जात आहेत.
पाकिस्तान: दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते लढाऊ विमान, हल्लात ११ जण ठार
पाकिस्तानी सैन्याने युद्धबंदी मोडली, सीमेवर गोळीबार