आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- भारतावरच युद्धखोरीचा आरोप करणा-या पाकिस्ताननने काहशी नरमाईची भूमिका घेतली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर युद्धबंदीच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश पाकिस्तानने सैनिकांना दिला आहे. भारतीय सेना आणि राजकीय पक्षांनी कडक भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानने पावित्रा बदलला आहे. दरम्यान, भारत-पाक तणावाला वेगळेच रंग लागण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी या मुद्यावरुन संयुक्त राष्ट्रांच्या सचिवांशी चर्चा केली आहे. याबाबत भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्राकडे हा मुद्दा देऊन पाकिस्तानने सिमला कराराचा भंग केल्याचा आरोप भारताने केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये आता राजकीय युद्ध सुरु झाले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी भारतावरच युद्धखोरीचा आरोप केला होता. तसेच भारतानेच नियंत्रण रेषेवर गोळीबार केल्याचा आरोप केला होता. त्यास लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांनी सडेतोड उत्तर दिले होते. आज त्यांनी पावित्र बदलून भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. हिना रब्बानी खार म्हणाल्या, नियंत्रण रेषेवर झालेल्या घटनेनंतर भारतातील राजकीय नेते आणि लष्करी अधिका-यांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यामुळे परिस्थिती चिघळू शकते. त्यामुळे हा मुद्दा चर्चेने सोडवावा, हे दोन्ही देशांसाठी चांगले आहे. एलओसी आणि युद्धबंदीशी संबंधित सर्व मुद्द्यांवर परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असे खार म्हणाल्या.
पाकिस्तानने युएनमध्ये काल भारताविरोधात तक्रार केली होती. त्यावरुन भारतात प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. परंतु, पाकिस्तानने दिलेल्या चर्चेच्या आमंत्रणावर विचार करु, असे सरकारतर्फे केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.