आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागरावरील वर्चस्वासाठी भारत-चीनमध्ये स्पर्धा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत आणि चीनमध्ये सागरी क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. याआधी दोन्ही देशांत हिमालयातील सीमेवरून वाद होत राहिला आहे. मात्र, हिंदी तसेच प्रशांत महासागरावरून दोन्ही देशांत वाढलेली स्पर्धा तिहेरी झाली आहे. यामध्ये तिसरा शक्तिशाली देश अमेरिका आहे. परराष्ट्र व्यवहारविषयक तज्ज्ञ सी. राजामोहन यांच्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. राजामोहन यांच्या पुस्तकाचे शीर्षक ‘समुद्र मंथन : सिनो- इंडिया रायव्हलरी इन इंडो पॅसिफिक’ असे आहे.
पुस्तकातील अन्य काही महत्त्वाचे मुद्दे
दोन्ही देश आपआपल्या हितरक्षणासाठी नौदलाचा विस्तार करत आहेत. हिंदी महासागर तसेच प्रशांत महासागरात ते आफ्रिकेपासून आॅस्ट्रेलियापर्यंत आपआपले अस्तित्व दाखवत आहेत. भारताने व्हिएतनामशी तेल व गॅस उत्खननाबाबत करार केला होता. तो रोखल्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानसह इतर शेजारी देशांशी चीन चांगले संबंध ठेवून आहे. चीन या देशांमध्ये मोठमोठी बंदरे उभारत आहे. यामुळे साहजिकच भारताला चिंता वाटत आहे. अमेरिकेचे या क्षेत्रात प्रमुख शक्ती म्हणून अस्तित्व आहे. तीनही देशांच्या सागरी शक्तीमध्ये बरेच अंतर आहे. असे असताना तिहेरी तणावात हिंदी, प्रशांत महासागर क्षेत्रातील चित्र बदलू शकते.