आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिकागो/नवी दिल्ली- मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा एक प्रमुख सुत्रधार डेव्हीड कोलमन हेडलीला अमेरिकेतील न्यायालयाने 35 वर्षांची शिक्षा सुनावली. परंतु, त्याला फाशीच द्यायला हवी अशी मागणी करताना त्याच्या प्रत्यार्पणासाठी पुरेपूर प्रयत्न भारताकडून सुरु असल्याचे केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी स्पष्ट केले.
हेडलीने फाशीची शिक्षेपासून वाचण्यासाठी अमेरिकेच्या सरकारसोबत एक करार केला आहे. त्यानुसार तो प्रत्येकवेळी गरज पडल्यास चौकशीसाठी सहकार्य करेल. तसेच इतर देशांनाही गरज भासल्यास माहिती देईल. त्यामोबदल्यात सरकारने त्याला फाशीच्या शिक्षेऐवजी 35 वर्षांच्या शिक्षेची शिफारस करण्यात आली. तसेच त्याचे कोणत्याही देशात प्रत्यार्पण करणार नाही, असेही या करारात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भारतासोबत हा एकप्रकारचा धोकाच असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे. त्याला भारताकडे सोपविण्याची मागणी भाजप व इतर विरोधी पक्षांनी केली आहे.
हेडलीने शिक्षेच्या सुनावणीपूर्वी न्यायाधिशांना एक पत्र लिहीले. त्यात त्याने स्वतःमध्ये बरेच बदल झाल्याचा दावा करुन असा गुन्हा पुन्हा घडणार नाही, असे म्हटले. न्यायाधिशांनी याचा उललेख शिक्षा सुनाविताना केला. ते म्हणाले, हेडलीने गुन्हा केला. गुन्ह्यांमध्ये मदत केली. त्यासाठी त्याला पुरस्कारही देण्यात आला. आता तो म्हणतो की मी बदललो. मी यावर विश्वास ठेऊ शकत नाही. हेडलीपासून जनतेला वाचविणे हे माझे कर्तव्य आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. परंतु, सरकारने 35 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनाविण्याची शिफारस केली आहे. त्याला फाशीच द्यायला हवी. परंतु, मी सरकारचा प्रस्ताव मान्य करतो.
हेडलीला फाशीची शिक्षा न दिल्यामुळे भारतात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मुंबईवरील हल्ल्यात ठार झालेल्या अमेरिकन नागरिकांच्या नातेवाईकांनीही तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. हेडलीला फाशीच द्यावी, अशी मागणी भारताने केली आहे. तसेच त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी स्पष्ट केले. हेडलीवर भारतात खटला चालवावा, अशी मागणी भारताने केली होती. भारतात सुनावणी झाल्यास त्याला फाशीचीच शिक्षा होईल, असे खुर्शीद म्हणाले. हेडलीने अमेरिकन सरकारसोबत केलेल्या करारातील अटींचा भंग केल्यास त्याचे भारतात प्रत्यार्पण शक्य असल्याचे अमेरिकेतील तज्ञांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.