आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस अब्ज डॉलरचे विमान कंपन्यांवर कर्ज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नियोजन आयोगाने 12 व्या योजनेत तोट्याच्या आकाशात उडणारे भारतीय कंपन्यांचे विमान जमिनीवर आणण्यासाठी काही उपायोजना सुचवल्या आहेत. भारतीय विमान कंपन्यांच्या डोक्यावरील वाढत्या कर्जाचा डोंगर चालू आर्थिक वर्षाअखेर तब्बल 20 अब्ज डॉलरवर जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या भारतीय विमान उद्योगात मोठ्या प्रमाणात सातत्यपूर्ण गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे योजना आयोगाने म्हटले आहे.
भारतीय विमान कंपन्यांना 2011 - 12 या आर्थिक वर्षात 20 अब्ज डॉलर इतक्या रकमेचे अमर्याद कर्ज होण्याचा धोका आहे. भारतीय कंपन्यांचे भरकटलेले विमान जमिनीवर आणण्यासाठी 12 व्या पंचवार्षिक योजनेत काही कठोर उपाययोजना आयोगाच्या एका अभ्यास गटाने सुचवल्या आहेत. इंडियन एअरलाइन्समधील हिस्सेदारी वाढवण्यासाठी विदेशी विमान कंपन्यांना परवानगी द्यावी. तसेच देशांतर्गत पातळीवर विमान इंधन कर तर्कसंगत बनवणे तसेच भारतीय विमान उद्योगात परकीय विमान कंपन्यांची गुंतवणूक व्हावी, असे आयोगाने म्हटले आहे.
12 व्या योजनेत (2012-17) या पाच वर्षांच्या काळात 54 हजार 743 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा अंदाजित आऊटलेटचा प्रस्ताव आहे. यात एअर इंडियासाठी 32 हजार 963 कोटी व एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियासाठी 17 हजार 500 कोटी रुपयांचा प्रस्ताव समाविष्ट आहे. अभ्यास गटाने म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात 20 अब्ज डॉलरच्या महाकाय कर्जापैकी 50 टक्के कर्ज एअरक्राफ्टसंबंधी असून उर्वरित खेळते भांडवल कर्ज आहे.
सध्याचे एफडीआय धोरण परदेशी विमान कंपन्यांचे गुंतवणूक धोरणाला परवानगी देत नाही. त्यामुळे संभाव्य स्रोतांपर्यंत पोहोचण्यास अडथळे येतात. कंपन्यांना इंधन, विमान भाड्याने घेणे, विमानतळ चार्जेस, विमान प्रवासी तिकीट कर, देखभाल, एअर नेवीगेशन सर्व्हिस चार्जेस अशा विविध करांचा भरणा करावा लागतो. त्याची फेररचना करण्याची गरज आहे, असे अहवालात म्हटले आहे.

35 हजार भरा, 15 दिवस फिरा

जर तुम्ही सुटीला कुठे फिरण्याची योजना बनवत असाल तर एअर इंडियाच्या नव्या ऑफरचा विचार करू शकता. आर्थिक मंदी, तोटा, वैमानिकांचा संप, अशा विविध अडचणींना सामोरे जाणाºया एअर इंडियाने ‘35 हजार रूपये भरा आणि 15 दिवस विमानाने कुठेही फिरा,’ अशी आकर्षक योजना
जाहीर केली आहे.
एअर इंडियाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तीन वेगवेगळ्या श्रेणीत योजना जाहीर केली आहे. 35 हजार रुपये भरल्यास इकॉनॉमिक्स क्लासमधून 15 दिवस प्रवासाची संधी उपलब्ध करून दिली आहे.तर बिझनेस क्लासमधून 75 हजार रुपये भरून ही सुविधा प्रवाशांना स्वीकारता येईल. एअर इंडियाचे स्टेशन मॅनेज एम. आर. जिंदल यांनी सांगितले की, ही योजना 30 एप्रिलपर्यंत लागू असेल.

एअर इंडियाचे दोन प्लॅन
या योजनेअंतर्गत प्रवासी आधी बुकिंग करून कोणतेही शेड्यूल स्वीकारू शकतो. सोबत टप्याटप्याने त्याचा फायदा घेऊ शकतो. यात प्रवाशाला एक पास दिला जाईल. त्याआधारे त्याला पुढची नोंदणी वाढवता येऊ शकते.

असे होईल बुकिंग
या योजनेत एअर इंडियाच्या airindia.com या वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करता येऊ शकते. या योजने ऑनलाइन बुकिंग करता येऊ शकते. अधिक माहितीसाठी 18001801407 या क्रमांकावर संपर्क येऊ शकतो.