आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Ari Force Buying 400 Areoplanes And Helicopater

भारतीय हवाई दल 400 विमाने आणि हेलिकॉप्टरची खरेदी करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बंगळुरू - आशियातील सर्वात मोठ्या नववा ‘एअरो इंडिया’ एअर शोला बुधवारपासून बंगळुरूजवळील येलहंका हवाईदल तळावर सुरू होत आहे.
पाच दिवस चालणा-या या शोमध्ये देशविदेशातील 600 हून अधिक कंपन्या सहभागी होत आहेत. शोच्या एक दिवस आधीच भारतीय हवाई दल 80 हजार कोटी रूपयांची 400 विमाने आणि हेलिकॉप्टरची खरेदी करणार असल्याची घोषणा करून हवाईदल प्रमुख एन.ए.के. ब्राऊन यांनी सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकवला आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये हवाई दलाने विविध प्रकारची 350 ते 400 विमाने खरेदी करण्याची योजना तयार केली आहे. पुढील महिन्यात 56 विमानांच्या खरेदीच्या निविदा जारी करण्यात येणार आहेत. ही विमाने पूर्णत: खाजगी क्षेत्रातच विकसित केली जाणार आहेत, असे ब्राऊन यांनी आंतरराष्ट्रीय एअरोस्पेस चर्चासत्रात बोलताना सांगितले.

या वेळचे खास आकर्षण
वैमानिकांच्या प्राथमिक प्रशिक्षणासाठी खरेदी करण्यात आलेले पहिले पिलाटस विमान भारत-रशियाचा संयुक्त उपक्रमातील पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाचे मॉडेल सादर होणार जगप्रसिद्ध रफालची डिस्प्ले टीम आणि रशियन नाइट्स एअरोबॅटिक्स स्क्वॉड्रन दाखवणार कौशल्य महाकाय यूएससी 17 ग्लोबमास्टर हे दळणवळण विमान. जूनमध्ये हे विमान अमेरिकेतून भारतात येणार आहे. या वर्षाअखेरीस या विमानांचे एक स्क्वॉड्रन तयार होईल.
स्वदेशी ध्रुव अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टरचे शस्त्रास्त्रांनी सज्ज हेलिकॉप्टर रुद्रही सादर होणार भेट स्विकारण्यास अँटनींचा नकार
संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी डब्यामध्ये बंद भेटवस्तू स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे एअरोस्पेस सेमिनारचे आयोजक चकित झाले. हा डबा उघडा, असे संरक्षणमंत्री म्हणाले. त्यामध्ये स्वदेशी लढाऊ विमान तेजसचे मॉडेल होते. ते पाहून अँटनी आनंदी झाले आणि त्यांनी ही भेट स्वीकारली.