आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राविरुद्ध लष्करप्रमुख कोर्टात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी सोमवारी जन्मतारखेच्या वादात सरकारविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागितली. संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या कागदपत्रांनुसार निश्चित केलेली जन्मतारीख चुकीची असल्याचे सांगत त्यांनी या निर्णयाला एका याचिकेद्वारे आव्हान दिले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात विद्यमान लष्करप्रमुखांनी सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची ही पहिलीच घटना आहे.
एनडीएच्या कागदपत्रांनुसार संरक्षण सचिवालयात सिंह यांची जन्मतारीख 10 मे 1950 अशी नोंद आहे. मात्र दहावी प्रमाणपत्राचा हवाला देत ही तारीख 10 मे 1951 असल्याचा दावा त्यांनी केला होता. केंद्राने तो फेटाळून लावल्यावर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सरकारी दस्तऐवजातील तारखेनुसार सिंह 31 मे रोजी निवृत्त होत आहेत.
13 लाख जवानांचे नेतृत्व करतो
मी 13 लाख जवानांचे नेतृत्व करतो. त्यामुळे हा वाद माझा आत्मसन्मान, प्रामाणिकतेशी निगडित आहे. गेली 36 वर्षे ठराविक कालावधीनंतर नियमानुसार मला पदोन्नती देण्यात आली. मग आता जन्मतारीख बदलण्याचा निर्णय का घेतला?
व्ही. के. सिंह, लष्करप्रमुख
लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्या नोकरी की प्रतिष्ठेची लढाई ?