आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Constitution Is Great As A Gita, Kuran And Bibal

भारतीय राज्यघटना धर्मग्रंथांइतकीच पवित्र - सरन्यायाधीश कबीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - गीता, कुराण, बायबल आणि घटना एकसमान आहेत, भारतीय राज्यघटना या धर्मग्रंथांइतकीच पवित्र आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांनी व्यक्त केले आहे. ते गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या (जीएनएलयू) चौथ्या दीक्षांत समारंभात बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित होते.
पुढे बोलताना कबीर यांनी वकिलांची प्रतिमा सुधारण्याची गरज व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून वकिलांची प्रतिमा शार्कसारखी झाली आहे. ती बदलण्याची व त्यातून त्यांनी बाहेर पडण्याची वेळ आली आहे. मोदी म्हणाले, प्रदीर्घ काळ प्रलंबित राहणारे खटले माणसाला शिक्षा आणि अधिक संकट देतात. प्रलंबित खटल्यांचा निकाल लवकर लागला पाहिजे. लॉ युनिव्हर्सिटी लघु भारतासारखी आहे. येथून बाहेर पडणारे विद्यार्थी गुजरातचे दूत बनून राज्याचे खरे चित्र जगासमोर ठेवण्याचे काम करतात.