आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डर्टी पिक्चर्सचा बाजार गरम !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काहीही म्हणा, भारतीय सिनेमा आता भलत्याच वेगाने ‘प्रौढ’ होतोय... यात काही दुमत होण्याचे कारणच नाही. इतकेच नव्हे तर आता पोर्न ‘कलाकार’ही बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून मिरवतेयं. चित्रपटांत आक्षेपार्ह दृश्यांना कात्री लावणाºया भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या ताज्या आकडेवारीनुसार अ‍ॅडल्ट किंवा प्रौढांसाठीच्या चित्रपटांची संख्या अपेक्षेपेक्षाही अधिक प्रमाणात वाढत आहे. 2011 मध्ये भारतीय प्रेक्षकांनी तब्बल 200 पेक्षा ‘ए’ ग्रेड चित्रपटांचा लुफ्त घेतला.
भारतात हिंदी, तामिळ, कन्नड आणि तेलगू भाषांत सर्वाधिक चित्रपटनिर्मिती होते. उपलब्ध आकडेवारीनुसार या चार भाषांत गेल्या वर्षात 600 चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी सुमारे 175 पेक्षा अधिक चित्रपट ‘ए’ प्रमाणपत्र असलेली होती. यात देशविदेशातील व व्हिडीओवरील फीचर आणि बिगर फिचर चित्रपटांचा समावेश केला तर ‘फक्त प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र मिळवणाºया चित्रपटांची संख्या चक्क 700पेक्षा अधिकवर पोहोचते.
2011मध्ये सर्वाधिक चित्रपटनिर्मिती (आॅक्टोबर2011पर्यंतच्या आकडेवारीनुसार 175 सिनेमे) करण्याचा विक्रम हिंदीच्याच नावे आहे. यानंतर तेलगू - 157, तामिळ - 150 आणि कानडीत 108 चित्रपटांची निर्मिती झाली आहे. पाठोपाठ बंगालीत 100, भोजपुरीत 65 चित्रपट तयार झाले. मराठी चित्रपट उद्योगालाही उर्जितावस्था आली असून गेल्या वर्षी जवळपास 77 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. विशेष विनंतीवरून सेन्सॉर बोर्डाने उपलब्ध करावून दिलेल्या आकडेवारीनुसार 2011मध्ये सुमारे 1026 भारतीय फिचर फिल्म्सला बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले. यात 482 चित्रपटांना यू, 344 चित्रपटांना यूए आणि 200 चित्रपटांना ए म्हणजेच अ‍ॅडल्ट असे प्रमाणपत्र देण्यात आले. 210 विदेशी चित्रपटांपैकी 84 चित्रपटांना ‘प्रौढांसाठी’चा मान मिळाला.

‘ए’ ग्रेडकडे ओढा वाढला
चित्रपटातील दृश्ये कापली जाण्यापेक्षा आता बहुतेक चित्रपटकार सेन्सॉरकडून ‘ए’ प्रमाणपत्र आनंदाने स्वीकारतात. प्रेक्षक आता परिपक्व होत असल्याचे त्यांचे मत असते. गंमत म्हणजे अ‍ॅडल्ट चित्रपट तिकिटबारीवर चांगला व्यवसाय करत असल्याने त्यांना हटकून ‘ए प्रमाणपत्र’ हवे असते. विद्या बालनचा डर्टी पिक्चर याचे ताजे आणि सर्वांत हिट उदाहरण आहे.
- सेन्सॉर बोर्डाचा अधिकारी
डिजिटल फॉर्मेटची एंट्री
सेल्युलॉइड म्हणजेच रिळवरील चित्रपटांचे युग आता मागे सरायला सुरुवात झाली आहे. डिजिटल प्रकारातील चित्रपटांची संख्या वाढत आहे. यंदा 40 डिजिटल प्रकारातील चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. भारतात सरकार चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याच्या सध्याच्या श्रेणींच्या संख्येत वाढ करून सर्टिफिकेशन प्रक्रियेतही बदल करत आहे. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते.