आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Military Officer To Contact Bangladeshi Women And Leak To Information

'फेसबुक'द्वारा ले.कर्नलने प्रस्तापित केले बांगलादेशी महिलेशी संबंध!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर/ नवी दिल्ली: भारतीय लष्करातील एका अधिकार्‍याने सोशल मीडिया वेबसाइट 'फेसबुक'च्या माध्यमातून एका बांगलादेशी महिलेशी संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ले. कर्नल संजय शांडिल्य असे या लष्कर अधिकार्‍याचे नाव आहे. सध्या कर्नल शांडिल्य यांच्याविरुद्ध कोर्ट ऑफ इनक्वायरी सुरू आहे.
कर्नल शांडिल्य यांना शीबा नामक महिलेने गेल्या वर्षी आपल्या जाळ्यात अडकवले होते. शीबा ही बांगलादेशातील रहिवासी असून, ती पाकिस्तानी दहशतवादी संस्था आयएसआयची एजंट आहे. कर्नल यांनी शीबाला लष्कराची महत्त्वाची माहिती दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कर्नल शांडिल्य चंदेल सूरतगडमध्ये (श्रीगंगानगर) 82 आर्म्ड रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे. लष्कराच्या सूत्रांनुसार त्यांना आता दुसर्‍या यूनिटमध्ये पाठवण्‍यात आले आहे.
लष्कराचे प्रवक्ते ले.कर्नल जगदीप दहिया यांच्यानुसार, हे प्रकरण मे महिन्यात उघडकीस आले होते. आर्मी इंटेलिजेंसने कर्नल शांडिल्य यांच्यावर संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाबाबत रॉ आणि आयबी यांना कळवण्यात आले आहे.
काही वृत्तवाहिन्यांनी बुधवारी कर्नल शांडिल्य आणि शीबाला अटक झाल्याचे वृत्त प्रसारीत केले होते. परंतु हे वृत्त लष्कराने फेटाळून लावले आहे. कर्नल शांडिल्य आणि शीबा केवळ फेसबुकवर भेटत होते, असे सूत्रांनी सांगितले आहे.
लष्कर आणि सरकारमध्ये समन्वय नाही : राजनाथसिंह
आगामी 15 वर्षांत भारतीय लष्कर सुपरटेक होणार
शिख हत्याकांडात लष्कर-ए-तोयबाचा हात- जबिउद्दीन