आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Mujahideen Threatens Attack In Delhi Hotel

'मुंबईनंतर आता दिल्‍ली', इंडियन मुजाहिदीनची ईमेलवरुन धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍ली पोलिसांची एका ईमेलने झोप उडविली आहे. या ईमेलमध्‍ये दिल्‍लीमध्‍ये मुंबईची पुनरावृतृती करु, अशी धमकी देण्‍यात आली आहे. मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या धर्तीवर दिल्‍लीतही असाच हल्‍ला करण्‍याची धमकी आल्‍यामुळे पोलिसांसोबतच गुप्‍तचर यंत्रणा खळबळून जाग्‍या झाल्‍या आहेत.

गुरगावच्‍या एका पंचतारांकीत हॉटेलच्‍या अधिका-यांना रविवारी हा ईमेल प्राप्‍त झाला. त्‍यात 'मुंबई के बाद अब दिल्‍ली की बारी', असे लिहीले आहे. इंडियन मुजाहिदीनच्‍या आयडीवरुन हा ईमेल पाठविण्‍यात आला आहे. या आईडीविरुद्घ गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून गुप्‍तचर यंत्रणा कामाला लागल्‍या आहेत. ईमेलमध्‍ये या हॉटेलला बॉम्‍बने उडविण्‍याचीही धमकी देण्‍यात आली आहे. याशिवाय इतरही काही धमक्‍या त्‍यात देण्‍यात आल्‍या आहेत. यानंतर हॉटेल आणि जवळपासच्‍या परिसरातील सुरक्षा वाढविण्‍यात आली आहे.