आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसद भवन धोकादायक, नवी इमारत बांधण्‍याची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्लीतील सध्याच्या 85 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक संसद भवनाऐवजी लवकरच नवे टुमदार संसद भवन उभारले जाण्याची शक्यता आहे.
1927 मध्ये बांधण्यात आलेल्या सध्याच्या संसद भवनाच्या संरचनात्मक स्थैर्याबाबत शंका घेण्यात येऊ लागल्याने राज्यसभा आणि लोकसभेसाठी पर्याय सूचवण्यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात येणार आहे. नव्या संसद भवनाची जागा, आकार, क्षेत्रफळ आणि रचनेबाबतचा निर्णय ही लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार लवकरच स्थापणार असलेली ही उच्चाधिकार समितीच घेणार आहे, असे लोकसभेचे महासचिव टी.के. विश्वनाथन यांनी सांगितले. सध्याच्या संसद भवनाच्या मूळ ढाच्यामध्ये अतिक्रमण करून अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच या ऐतिहासिक इमारतीला काही ठिकाणी तडेही गेले असल्यामुळे पर्यायी संसद भवनाचा विचार समोर आला आहे.
सध्याच्या संसद भवनातील वाढती वर्दळ लक्षात घेता ही इमारत जास्त लोकांचा भार सहन करू शकणार नाही, असे लक्षात आल्यामुळे ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसद भवन ही देशातील सर्वाधिक वर्दळीची आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षकांची तटबंदी असलेली देशातील एक प्रमुख इमारत आहे. महिला आणि दुर्बल घटकांना न्यायोचित प्रतिनिधित्व देण्यासाठी पुढाकार घेण्यात येऊ लागल्यामुळे आगामी 50 वर्षांत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांची सदस्य संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.
संसद भवनाला भार सोसवेनासा झाला आहे. संसद भवनाच्या मूळ रचनेमध्ये एअर कंडिशनर्स, इलेक्ट्रिकल व दळणवळण यंत्रणेच्या केबल्स जाळे याची योजनाच नव्हती. लोकांच्या वर्दळीबरोबरच हा अतिरिक्त ताण या इमारतीला सोसावा लागत आहे.

अग्निशमनचे ‘नो ऑब्जेक्शन’ मिळालेच नाही
दिल्ली अग्निशमन दलाने सध्याच्या संसद भवनाला अद्याप नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. ते मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर करण्यात येत आहेत. मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी आवश्यक त्या सर्व उपाय योजना करण्याचे निर्देश लोकसभा महासचिवालयाला दिले आहेत. त्यानंतर सीपीडब्ल्यूच्या अधिकाºयांबरोबर बैठक
घेण्यात आली.
मंत्रालय अग्नितांडव; सजावट भोवली, प्‍लायवूडने केला घात
मंत्रालय इमारत सुरक्षितच; केवळ डागडुजी करण्याची गरज
मंत्रालय अग्निकांडांचा सीबीआयच्या 30 अधिकार्‍यांकडून तपास सुरू