आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतिपद निवडणूक : 49 उमेदवारांना दिली झेड प्लस सुरक्षा!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी 49 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्वांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यातील काही उमेदवार असे आहेत, ज्यांच्या घरासमोर सुरक्षा छावणी लावण्याइतपत जागाही नाही. उमेदवारी अर्ज भरणा-यांमध्ये रिक्षावाल्यांपासून आचारी म्हणून काम करणा-यांचा समावेश आहे. यातील एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाला अथवा तो बेपत्ता झाल्यास निवडणूक लांबणीवर पडू शकते. शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 65 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दोन जुलै रोजी अर्जांची छाननी होईल. ज्यांचा अर्ज फेटाळला जाईल, त्यांची सुरक्षा आपोआपच संपुष्टात येईल.
राज्यसभा सचिवालयाच्या एका अधिका-याने सांगितले की, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अधिनियम 1952 मध्ये 1997 ला दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये उमेदवारी अर्जासोबत 50 प्रस्तावक व 50 अनुमोदक असणे आवश्यक केले होते. याशिवाय अर्ज दाखल केला जाणार नाही, अशी अट नाही. त्यामुळे उमेदवार संख्या वाढते.

आज उमेदवारी अर्जांची छाननी
अर्ज फेटाळल्यानंतर सुरक्षा संपुष्टात
65 उमेदवारी अर्ज दाखल, 49 उमेदवार रिंगणात