आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगणक सुरक्षेत भारत अमेरिका, जपानपेक्षा पुढे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संगणक वापरात भारत भलेही इतर देशांच्या मागे असेल. मात्र, संगणक सुरक्षेच्या बाबतीत अमेरिका, जपान आणि सिंगापूरपेक्षा भारत पुढे आहे. सुरक्षा सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी मॅकेफीच्या ताज्या अहवालामध्ये हा खुलासा करण्यात आला आहे.
मॅकेफीने यासंदर्भात 24 देशांचा अभ्यास केला. त्यानुसार दर महिन्याला साधारण 2.7 ते 2.8 कोटी संगणकांची स्कॅनिंग करण्यात आली. जागतिक स्तरावर किती ग्राहकांनी आपल्या संगणकामध्ये आवश्यक सुरक्षा सॉफ्टवेअर बसवले हे या माध्यमातून दिसून आले. फिनलंडमध्ये सर्वाधिक 90.30 टक्के संगणकांमध्ये सुरक्षा सॉफ्टवेअर आहेत. त्यानंतर इटलीमध्ये हे प्रमाण 86.2 टक्के तर जर्मनीमध्ये ते 85.55 टक्के सुरक्षा सॉफ्टवेअर आहेत. बेसिक सुरक्षा सॉफ्टवेअर प्रणाली अँटी व्हायरस, अँटी स्पायवेअर आणि फायरवॉल तंत्रज्ञानाविरुद्ध काम करते. या यादीमध्ये भारत 82.67 टक्क्यांसह 14 व्या तर चीन 82 टक्क्यांसह 17 व्या स्थानी आहे. त्यानंतर जपान आणि अमेरिका 80.65 टक्क्यांसोबत 19 व्या, तर सिंगापूर 78.25 टक्क्यांसह 22 व्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर 83 टक्के संगणकामध्ये सुरक्षा सॉफ्टेवेअर बसवण्यात आले होते. 2011 पर्यंत भारतातील 60 लाख संगणकामध्ये बेसिक सुरक्षा सॉफ्टवेअर प्रणाली अस्तित्वात होती.
मॅकेफीचे सह अध्यक्ष टॉड गेबार्ट म्हणाले की, संगणकामध्ये किमान बेसिक सुरक्षा सॉफ्टवेअर बसवणे आवश्यक आहे हे बहुतेकांना माहीत असल्याबद्दल समाधान वाटले. याचा वैयक्तिक फायदा तर मिळतोच शिवाय डिजिटल उपकरणांना सायबर गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी मदत मिळते. परिणामी अवैध काम करणाºयांना त्यापासून रोखले जाईल. या सर्वांचा परिणाम म्हणून इंटरनेटवर विश्वासाहर्ता टिकून राहील.

सुरक्षा सॉफ्टवेअरमुळे सायबर गुन्ह्यांपासून बचाव
बॅँका, तंत्रज्ञानविषयक संस्था, ई-स्टोअर्स आणि शासकीय कार्यालयांतील सायबर हल्ल्यांमुळे लाखो डॉलर्सचे नुकसान सोसावे लागते. स्कॅन करण्यात आलेल्या 17 टक्के संगणकांमध्ये अँटी व्हायरस प्रणाली बसवण्यात आली नाही किंवा त्याचे अस्तित्व नगण्य असल्याचे दिसून आले आहे. संगणकात सुरुवातीस बसवण्यात आलेल्या सुरक्षा सॉफ्टवेअर प्रणालीचा अवधी संपुष्टात आल्यानंतर संगणकाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, हे लोक समजून घेत नाहीत. संगणक सुरक्षा ही सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी उपयोगी ठरते, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
ब्रिटिश संशोधकांनी शोधला संगणक बनवणारा बॅक्टेरिया