आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India's Right To Have Member At Security Council : Fransco Oland

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युनोच्‍या सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्व हा भारताचा हक्क - फ्रान्स्वा ओलांद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताशी लष्करी, राजकीय, व्यापार व शिक्षण क्षेत्रात घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यास फ्रान्स उत्सुक आहे.फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी जगभरात भारताचा प्रभाव वाढत असल्याचे मान्य करून भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळण्याचा हक्क असल्याचे म्हटले आहे.

भारत दौ-यांवर आलेले ओलांद दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालयात माधवराव सिंधिया स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माधवीराजे सिंधिया होत्या. ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ओलांद यांचे स्वागत केले. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचा ओलांद यांनी सत्कार केला.भारताने इराणशी असलेल्या संबंधांचा उपयोग करून इराणचा अणू कार्यक्रम रोखण्यास मदत करावी असे आवाहनही ओलांद यांनी केले. ’

ओलांद यांनी शुक्रवारी आपल्या मुंबई भेटीत महाराष्ट्राला सर्व क्षेत्रात मदतीचे आश्वासन दिले.पायाभूत, पाणी, वाहतूक आणि बॉलीवूडला देखील फ्रान्सकडून सहकार्य मिळेल, अशी ग्वाही ओलांद यांनी दिली. महाराष्ट्राशी सहकार्य आणखी वाढवण्यावर फ्रान्सचा भर आहे. असे ते म्हणाले.

नेहरू,गांधींच्या आठवणी
शांतता व अलिप्ततावादी धोरणात गांधी व नेहरूंच्या योगदानाच्या आठवणीही त्यांनी जागवल्या. ते म्हणाले की, ‘2014 नंतर नाटो सैन्य अफगाणिस्तानातून परतू लागेल तेव्हा तेथील संभाव्य परिस्थितीबाबत भारत चिंतित आहे. अफगाणिस्तानने स्वत:च आपले भविष्य ठरवले पाहिजे.’ यासंदर्भात पाकिस्तानला उद्दिष्ट व कर्तव्यपूर्ती करण्यासही त्यांनी सांगितले. सीमेपलीकडून होण-या चिथावणीखोर कारवायांकडे निर्देश करीत ओलांद यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील भारताच्या भूमिकेची प्रशंसा केली. सर्व वादविवाद शांततापूर्ण मार्गाने टाळणा-या आणि चिथावणीखोर कारवायांना उत्तर देण्याबद्दल दिल्लीच्या धोरणाचीही त्यांनी स्तुती केली.

भारताने सक्रिय भूमिका निभवावी
ओलांद म्हणाले की, ‘आज आमची इच्छा आहे की, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य व्हावा. येथे जगातील 17 टक्के लोकसंख्या राहते. त्यामुळे जगाच्या संरक्षणास भारताची आवश्यकता आहे जगात भारत शांततेसंदर्भात एक मोठी शक्ती आहे. आंतरराष्ट्रीय कलह मिटवण्यात भारताने सक्रिय भूमिका निभावली पाहिजे.

शिक्षण क्षेत्रात भागिदारीची तयारी
भारतात एक कोटी 70 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 3 हजार विद्यार्थीच उच्च शिक्षणासाठी फ्रान्समध्ये जातात. त्याबद्दल खेद व्यक्त करीत ही दरी भरून काढण्याची गरज ओलांद यांनी
व्यक्त केली. दोन्ही देशातील प्रतिभावंतांनी सोबत काम करावे, असेही ते म्हणाले.