आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indira Gandhi First Women Prime Minister Of India

पडद्यामागील खेळी.., इंदिरा गांधी कशा बनल्या पंतप्रधान?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद: श्रीमती इंदिरा गांधी या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. 19 जानेवारी 1966 रोजी इंदिरा गांधींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. या घटनेला 45 वर्षे झाली असली तरी कुशल नेतृत्त्व, अचूक निर्णय क्षमता आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेल्या इंदिरा गांधींचे आजही स्मरण केले जाते. इंदिरा गांधी या पंतप्रधानपदापर्यंत कशा पोहचल्या? यामागे चांगलीच राजकीय खेळी रंगली होती. ते आपण जाणून घेऊया.
गुजरातचे लाल आणि माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यावर मात करत इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधानपदी विराजमान झाल्या होत्या. इंदिरा गांधींना पंतप्रधानपदासाठी देशातील 16 पैकी 11 राज्यांनी समर्थन जाहीर केले होते. या राज्यातील नेत्यांनी एकत्र येवून इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी पूर्ण बहूमतही द‍िले होते.
उल्लेखनीय म्हणजे इंदिरा गांधी यांची लढत कॉंग्रेसचेच गुलजारीलाल नंदा आणि मोरारजी देसाई यांच्याशी होती. परंतु तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या अकस्मात निधनानंतर प्रभारी पंतप्रधान बनलेले गुलजारी लाल नंदा यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. त्यामुळे इंदिरा गांधी यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला होता.
इंदिरा गांधी आणि गुजराती नेता मोराजी देसाई यांच्यात सरळ लढत झाली होती. या काळात मोरारजी देसाई यांनी माघार घ्यावी, यासाठी त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात दबाब आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु ते थोडेही डगमगले नव्हते. पंतप्रधानपदासाठी झालेल्या निवडणुकीत मोरारजी देसाई यांना कॉंग्रेसच्या 525 खासदारांपैकी 100 पेक्षाही कमी खासदारांचे समर्थन मिळेल असे बोलले जात होते. मा‍त्र घडले ते फारच वेगळे होते. मोरारजी देसाई यांना त्या काळी 169 खासदारांनी पाठिंबा दिला होता. परंतू पंतप्रधानपदासाठी हा पाठिंबा कमीच पडणारा होता. अशा प्रकारे इंदिरा गांधी 19 जानेवारी 1966 मध्ये स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या होत्या. इंदिरा गांधी यांची निवड कशी झाली हे तर मोराजी देसाई यांनाही कळले होते. तरी देखील त्यांनी इंदिरा गांधींना शुभेच्छा दिल्या होत्या.
इंदिरा भवनच्या नामांतरावर ममता बॅनर्जी ठाम